वस्त्रोद्योग मंत्रालय
शेतकरी आणि वस्त्रोद्योग या दोघांच्याही हिताचा विचार करून केंद्र सरकारने 1 जून ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत कापूस आयातीवरील सीमाशुल्कात दिली तात्पुरती सूट
प्रविष्टि तिथि:
30 MAY 2026 6:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मे 2026
कापूस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण कापूस मूल्यसाखळीचे हित सर्वोच्च मानत, भारत सरकारने एक जून ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत कापूस आयातीवरील सीमाशुल्क तात्पुरते माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे
कापसाचा हंगाम नसलेल्या कालावधीत लागू करण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल. तसेच, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पाठबळ मिळेल, उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या खर्चावर नियंत्रण राहील आणि भारतीय वस्त्रोद्योगाची स्पर्धात्मकता अधिक बळकट होईल. याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण आणि बाजारातील स्थैर्य कायम राखण्यासही मदत होईल.
* * *
राधिका अघोर/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2267036)
आगंतुक पटल : 73