पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी गोव्यातील जनतेला दिल्या गोवा राज्य दिनानिमित्त शुभेच्छा
Posted On:
30 MAY 2026 11:14AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोवा राज्य दिनानिमित्त गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, गोवा आपल्या चैतन्यमय संस्कृतीसाठी, समृद्ध वारशासाठी, निसर्गसौंदर्यासाठी आणि मनमिळावू, आदरातिथ्यशील जनतेसाठी ओळखला जातो.
पंतप्रधानांनी नमूद केले की, हा प्रसंग गोव्याच्या प्रगतीसाठी आणि अस्मितेसाठी अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याची एक संधी आहे.
गोवा असाच प्रगती करत राहील आणि विकसित भारत घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत राहील, अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
नरेन्द्र मोदी यांनी प्रत्येक गोवेकराच्या उत्तम आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थनाही केली.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर लिहितात;
“गोवा राज्य दिनाच्या विशेष प्रसंगी गोव्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा. गोवा आपली चैतन्यमय संस्कृती, समृद्ध वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि आदरातिथ्यशील मनमिळावू लोकांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. हा दिवस गोव्याच्या प्रगतीसाठी आणि अस्मितेसाठी अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याची एक संधी आहे. गोवा असाच प्रगती करत राहो आणि विकसित भारत घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत राहो. प्रत्येक गोवेकराच्या उत्तम आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो.”
* * *
यश राणे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2266911)
अभ्यागत कक्ष : 10