शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ.के.राधाकृष्णन यांच्यासह नीट-युजी 2026 च्या पुनर्परीक्षेच्या तयारीचा घेतला आढावा
देखरेख आणि सुरक्षा उपायांचे मूल्यमापन तसेच त्यात वाढ करण्याबाबत बैठकीत चर्चा
Posted On:
27 MAY 2026 9:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2026
आगामी नीट-युजी पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांच्यासह एक उच्चस्तरीय बैठक झाली. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेवरील शिफारशींच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्षपदही डॉ. के. राधाकृष्णन यांच्याकडे आहे.

या बैठकीला उच्च शिक्षण विभागाचे सचिव, एनटीएचे महासंचालक, एनटीएचे वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षण मंत्रालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीदरम्यान, एनटीएच्या महासंचालकांनी परीक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि ती सुरळीत पार पाडण्यासाठी घेतलेल्या अतिरिक्त उपायांची माहिती दिली. यामध्ये सध्याच्या देखरेख व्यवस्थेचे संपूर्ण मूल्यमापन करणे आणि त्यात पुढे आणखी वाढ करण्याच्या योजनांचा समावेश होता.

सुरक्षित परीक्षेला सर्वोच्च महत्त्व देताना देशभरातील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा आणि तणावमुक्त वातावरण देण्यासंदर्भातदेखील प्राधान्य दिले पाहिजे, यावर प्रधान यांनी भर दिला. नीट युजी पुनर्परीक्षा 21 जून 2026 रोजी देशभरातील 550 शहरांमधील 5,400 पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.
सोनाली काकडे/राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2266076)
अभ्यागत कक्ष : 9