इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडिया सेमीकंडक्टर मिशन (आयएसएम), MeitY ने या क्षेत्रातील सर्व घटकांच्या आणि गुंतवणुकदारांच्या सहाय्यासाठी इन्व्हेस्टर्स सपोर्ट हे पोर्टल सुरु केले

Posted On: 26 MAY 2026 2:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मे 2026

भारत सरकार, देशात एक सर्वसमावेशक, विश्वासार्ह आणि शाश्वत सेमीकंडक्टर परिसंस्था विकसित करण्यासाठी विविध धोरणात्मक उपक्रम आणि धोरणात्मक नवोन्मेषाद्वारे सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. याचा एक भाग म्हणून सेमिकॉन इंडिया या कार्यक्रमा अंतर्गत, आतापर्यंत 12 फॅब अर्थात जोडणी किंवा पॅकेजिंग   प्रकल्पांना, तसेच 24 सेमीकंडक्टर डिझाइन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवण्याबरोबरच त्यांच्या विविध शंका आणि समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने, इंडिया सेमीकंडक्टर मिशनने 26.05.2026 रोजी इन्व्हेस्टर्स सपोर्ट नावाचे एक ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल https://www.ism.gov.in/investment या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतात गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकारी योजना, धोरणे, सेमिकॉन इंडिया कार्यक्रमा अंतर्गत मंजूर झालेले प्रकल्प, नियामक आवश्यकता इत्यादींशी संबंधित माहिती पुरवण्यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

या पोर्टलद्वारे गुंतवणूकदारांना त्यांच्या तक्रारी किंवा समस्यांची नोंद करणे देखील शक्य होईल. इंडिया सेमीकंडक्टर मिशन चे अधिकारी, तसेच संबंधित मंत्रालये, विभाग, संस्था, राज्य सरकारे, मंजूर प्रकल्प कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय व्यापारी संस्था/संघटनांच्या नोडल अधिकाऱ्यांच्या सहकार्याने या तक्रारींचे निराकरण केले जाईल.

पोर्टलच्या प्रकाशन कार्यक्रमात, आयएसएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितेश कुमार सिन्हा यांनी परदेशी गुंतवणूकदारांना मार्गदर्शन आणि सुविधा पुरवण्याच्या महत्त्वावर भर दिला. देशातील सेमीकंडक्टर उत्पादन आणि डिझाइन परिसंस्था अधिक बळकट करण्यासाठी, गुंतवणूकदारांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या प्रक्रियेत सर्व संबंधित भागधारकांच्या प्रतिनिधींनी सक्रियपणे आपली भूमिका पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

संबंधित भागधारकांना सुनियोजित समन्वय साधण्यासाठी आणि समस्यांचे मर्यादित काळात निराकरण करण्यासाठी एक सुरक्षित, निश्चित जबाबदारी आधारित आणि एक-खिडकी  स्वरूपाचे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

या उद्घाटन समारंभात पोर्टलची रचना, कार्यपद्धती, नोंदणी प्रक्रिया, समन्वयाची यंत्रणा, तसेच सहभागी मंत्रालये, विभाग, संस्था, राज्य सरकारे, मंजूर प्रकल्प कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय व्यापारी संस्था/संघटनांच्या नोडल अधिकाऱ्यांची भूमिका व जबाबदाऱ्या, यांची सविस्तर सादरीकरणातून माहिती देण्यात आली. 


नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2265348) अभ्यागत कक्ष : 9