पंतप्रधान कार्यालय
कर्नाटक मधील कारवार येथील दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त;
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह मदत जाहीर
Posted On:
24 MAY 2026 6:51PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक मधील कारवार जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या असून, जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृत व्यक्तीच्या वारसांना 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी' (PMNRF) मधून 2 लाख रुपयांची, तसेच, या घटनेत जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहिर केली आहे.
'X' वरील पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणतात,
"कर्नाटकच्या कारवार जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेबद्दल अत्यंत दुःख झाले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती माझ्या सहवेदना. जखमी लवकर बरे होवोत हीच प्रार्थना. PMNRF मधून प्रत्येक मृताच्या वारसाला 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल, तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील: PM @narendramodi"
***
सुषमा काणे/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2264828)
अभ्यागत कक्ष : 19