गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अहमदाबाद येथे  केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते  राष्ट्रीय डिझाइन संस्थेमध्ये (एनआयडी) इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन.

Posted On: 17 MAY 2026 5:38PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज राष्ट्रीय डिझाइन संस्था (एनआयडी)मध्ये इनोवेशन अँड इनक्युबेशन सेंटर (आयआयसी) चे उद्घाटन केले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि विविध मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

WhatsApp Image 2026-05-17 at 17.15.34.jpeg

या वेळी उपस्थितांना संबोधित करताना, अमित शाह म्हणाले, एनआयडी, सर्जनशीलता, नवोन्मेष आणि उद्योजकता यांना जोडणारी संस्था आहे.पारंपरिकदृष्ट्या डिझाइन ही एक विद्याशाखा मानले जाते पण ती एक कला देखील आहे, जी गोष्टींना अत्यंत सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण पद्धतीने सादर करते, असेही ते म्हणाले.

WhatsApp Image 2026-05-17 at 17.14.59.jpeg

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला उपजतच आरेखन/डिझाइनची समज असतेच या जाणि वेतूनच एनआयडीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, दैनंदिन आयुष्यातील आव्हाने पेलताना, डिझाइन क्षेत्रात उत्तुंग यश मिळवण्याची क्षमता असलेल्या अनेक व्यक्ती या क्षेत्रात गांभीर्यापूर्वक त्यात काम करू शकत नाहीत. एनआयडीची स्थापना करण्यामागील एक मुख्य उद्देश होता की डिझाइन क्षेत्राकडे उपजतच कल असलेल्या व्यक्तींना एक योग्य व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि त्यांच्यातील उपजत क्षमता समाजापुढे येण्यास मदत व्हावी असे शाह यावेळी म्हणाले. कोणत्याही क्षेत्राची क्षमता राष्ट्रीय दृष्टीकोनातून पूर्णपणे विकसित करायची असेल तर ते क्षेत्र व्यावसायिक पेशा म्हणून स्वीकारणे अपरिहार्य ठऱते. मग ते गीत लेखन असो, संगीत असो की डिझाइन,ही सर्व कलेची विविध रूपे आहेत मात्र शेवटी या सर्वांनाच व्यावसायिक पेशा म्हणूनही स्वीकारणे गरजेचे असते. डिझाइन आणि कला या क्षेत्रांमधील व्यावसायिक क्षमतांचा पुरेपूर वापर करण्याच्या उद्देशानेच गुजरातमध्ये एनआयडीची स्थआपना करण्यात आली असेही शाह यांनी नमूद केले.

WhatsApp Image 2026-05-17 at 17.15.18.jpeg

एनआयडीने डिझाइन क्षेत्रामध्ये अधिक सुधारणांना प्रोत्साहन दिले पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राची स्थापना हा कौतुकास्पद उपक्रम आहे, तरीही डिझाइन क्षेत्राला आपला पेशा म्हणून निवडणाऱ्या तरुणांना त्यांच्या व्यावसायिक अपेक्षा आणि आकांक्षांची पूर्तता करणाऱ्या संधी उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे असे शाह यांनी सांगितले. या उद्दीष्टपूर्तीसाठी एक स्वतंत्र विभाग निर्माण करावा लागेल, कारण डिझायनर्स प्रामुख्याने निष्णात सर्जक असतात, पण ते व्यावसायिक तज्ज्ञ असतीलच असे नाही असे त्यांनी नमूद केले. आगामी वर्षांमध्ये एनआयडीला या दोन्ही क्षेत्रांतील व्यावसायिकांची मोट बांधावी लागेल. तेव्हा भारत देशातील डिझाइन क्षमता पूर्णपणे विकसित करू शकेल आणि तरुणांनाही नि:शंकपणे डिझाइन क्षेत्राला आपला पेशा स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करू शकेल.

***

शैलेश पाटील/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2262087) अभ्यागत कक्ष : 17