पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सचे महाराज विलेम-अलेक्झांडर आणि महाराणी मॅक्झिमा यांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
16 MAY 2026 8:13PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हेग येथील पॅलेस हुइस टेन बॉश येथे नेदरलँड्सचे महाराज विलेम-अलेक्झांडर आणि महाराणी मॅक्झिमा यांची भेट घेतली.
पंतप्रधान आणि महाराजांनी दोन्ही देशांमधील नागरिकांमधील संबंध अधिक दृढ करण्यासह, भारत-नेदरलँड्स संबंध अधिक मजबूत करण्यावर विचारविनिमय केला. पंतप्रधानांनी 2019 मध्ये महाराजांच्या भारत भेटीची प्रशंसापूर्वक आठवण काढली. त्या भेटीने परस्पर सदिच्छा वाढविण्यात आणि द्विपक्षीय संबंधांना नवी गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिक्षण, नवोन्मेष, सेमी-कंडक्टर, डिजिटल, पाणी आणि हरित भागीदारी या क्षेत्रांत सुरू असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांवर नेत्यांनी समाधान व्यक्त केले.
भारताप्रती नेदरलँड्सच्या महाराजांच्या सदिच्छेबद्दल पंतप्रधानांनी कौतुक व्यक्त केले, आणि आपल्या दौऱ्यादरम्यान केलेल्या प्रेमळ पाहुणचाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महाराज आणि महाराणींनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजन केले होते.
***
माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2261868)
आगंतुक पटल : 49
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam