गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बाबा बंदा सिंग बहादूर जी यांच्या 'सरहिंद फतेह दिवसा'निमित्त दिल्या शुभेच्छा
तपस्वी वृत्तीचे, अजिंक्य योद्धे असलेले बाबा बंदा सिंग बहादूर जी धर्मरक्षणासाठी अत्यंत समर्पित योद्धे
असंख्य क्रूर अत्याचारांना सामोरे जाऊनही, बाबा बंदा सिंग बहादूर जी यांनी धर्मांतर स्वीकारले नाही
त्यांचे जीवन राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी सदैव प्रेरणास्रोत राहील
प्रविष्टि तिथि:
12 MAY 2026 11:07AM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज बाबा बंदा सिंग बहादूर जी यांच्या 'सरहिंद फतेह दिवसा'निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे, "धर्माप्रती अढळ निष्ठा, मातृभूमीसाठी संपूर्ण समर्पण आणि अन्यायाविरुद्ध असामान्य धैर्याचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या बाबा बंदा सिंग बहादूर जी यांच्या 'सरहिंद फतेह दिवसा'च्या हार्दिक शुभेच्छा.
तपस्वी वृत्तीचे, अजिंक्य योद्धे असलेले बाबा बंदा सिंग बहादूर जी धर्मरक्षणासाठी अत्यंत समर्पित योद्धे होते. त्यांनी शेतकऱ्यांना संघटित केले आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी मुघलांचा पराभव करून स्वाभिमान, साहस आणि धर्मरक्षणाचा अमर संदेश दिला. असंख्य क्रूर अत्याचारांना सामोरे जाऊनही, त्यांनी धर्मांतर स्वीकारले नाही. त्यांचे जीवन राष्ट्र आणि धर्माच्या रक्षणासाठी सदैव एक प्रेरणास्रोत राहील.''
***
NehaKulkarni / SonaliKakde / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2260176)
आगंतुक पटल : 41
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam