पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 जाहीर; 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पंचायतींचा गौरव


42 पंचायतींचा सत्कार; कर्नाटकला 6, तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाला प्रत्येकी 5 राष्ट्रीय पंचायत सन्मान

सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतींना 5 कोटी रुपयांपर्यंतचे पुरस्कार; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना 1 कोटी रुपयांचे प्रथम पारितोषिक

Posted On: 09 MAY 2026 3:53PM by PIB Mumbai

 

पंचायती राज मंत्रालयाने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 (एनपीए-2025) च्या विजेत्यांची घोषणा केली असून, या पुरस्कारांसाठी  देशभरातील एकूण 42 पंचायतींची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण सोहळा 3 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.

हे पुरस्कार दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. 

1. दीनदयाळ  उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार (डीडीयूपीएसव्हीपी) हा शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (एलएसडीजी) स्थानिकीकरणाच्या 9 संकल्पनांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी ग्रामपंचायतींना सन्मानित केले जाते.

या संकल्पना पुढीलप्रमाणे आहेत: दारिद्रयमुक्त आणि सुधारित उपजीविका, निरोगी पंचायत, बाल-स्नेही पंचायत, पाणी-समृद्ध पंचायत, स्वच्छ आणि हरित पंचायत, स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय्य आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित पंचायत, सुशासन असलेली पंचायत आणि महिला-स्नेही पंचायत.

प्रत्येक संकल्पनेअंतर्गत, प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार प्रदान केले जातात. एनपीए-2025 अंतर्गत, 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 34 ग्रामपंचायतींची दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून काही संयुक्त विजेत्यांचाही त्यात समावेश आहे. हे संकल्पना-आधारित पुरस्कार पंचायत प्रगती निर्देशांक (पीएआय) 2.0 च्या गुणांशी जोडलेले आहेत. 

2. नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सातत्यपूर्ण विकास पुरस्कार (एनडीएसपीएसव्हीपी) - हा पुरस्कार जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावरील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायतींना प्रदान केला जातो. एनपीए-2025 अंतर्गत, 8 पंचायतींची विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यात सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत श्रेणीतील 3, सर्वोत्कृष्ट तालुका पंचायत श्रेणीतील 2 आणि सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत श्रेणीतील 1 पंचायतींचा समावेश आहे.

विजेत्या पंचायतींना स्तर आणि श्रेणीनुसार, प्रति पुरस्कारार्थी 50 लाख ते 5 कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक प्रोत्साहन दिले जाते. हे पुरस्कार राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या (आरजीएसए) केंद्र पुरस्कृत योजनेचा एक केंद्रीय घटक असलेल्या 'पंचायती प्रोत्साहन योजना' (आयओपी) अंतर्गत दिले जातात. एप्रिल 2025 मध्ये, राष्ट्रीय पंचायती राज दिन–2025 च्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचायती आणि संस्थांना खालील विशेष श्रेणींअंतर्गत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार–2025 प्रदान केले होते : (1) हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार (सीएएसपीए), (2) आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार (एएनपीएसए) आणि (3) पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्कृष्ट संस्थान पुरस्कार (पीकेएनएसएसपी).

राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांविषयी

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायतींचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, पंचायती राज मंत्रालय दरवर्षी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान करते. या पुरस्कारांच्या माध्यमातून ग्रामीण भारतातील सर्वसमावेशक, सहभागी आणि शाश्वत विकासाला चालना दिली जाते. सुधारित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या (आरजीएसए) 'पंचायतींना प्रोत्साहन' या घटकाअंतर्गत दिले जाणारे हे पुरस्कार पंचायतींना समुदाय-नेतृत्वाखालील उपक्रमांद्वारे स्थानिक प्रशासन, सेवा वितरण आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती करण्यासाठी प्रेरणा देतात. 2023 मध्ये, पुरस्कारांची संरचना सुधारण्यात आली आणि ती शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणाच्या (एलएसडीजी) नऊ संकल्पनांशी संरेखित करण्यात आली. यामुळे पंचायतींचे मूल्यांकन अधिक समग्र, पारदर्शक आणि माहिती-आधारित बनले. परिणामी, 'विकसित भारत@2047' या राष्ट्रीय ध्येयाच्या पूर्ती करण्यासाठी पंचायती अधिक सक्षम बनत आहेत.

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025

दीनदयाळ उपाध्याय पंचायत निरंतर  विकास पुरस्कार 

–2025

अनुक्रमांक 

पुरस्कार संकल्पना /श्रेणी

राज्य/केंद्रशासित प्रदेश 

श्रेणी 

पुरस्कारार्थी ग्रामपंचायत (तालुका, जिल्हा)

पुरस्काराची रक्कम कोटी (रुपये

1

दारिद्य्र निर्मूलन आणि उपजिविका विकास करणाऱ्या पंचायती 

कर्नाटक 

1

मुद्रादी(हेबरी ,उडूपी )

1.00

2

दारिद्य्र निर्मूलन आणि उपजिविका विकास करणाऱ्या पंचायती

आंध्रप्रदेश

2

चेम्मुलापल्ली(काझीपेट,

वाय.एस.आर.)

0.75

3

दारिद्य्र निर्मूलन आणि विकास करणाऱ्या पंचायती

सिक्किम 

3

ग्यालशिंग,ओमचुंग (ग्यालशिंग)

0.50

4

आरोग्यपूर्ण पंचायत आरोग्यपूर्ण पंचायत 

त्रिपुरा 

1

कांचनबारी (कुमारघाट, उनाकोटी, )

1.00

5

आरोग्यपूर्ण पंचायत 

आरोग्यपूर्ण पंचायत 

कर्नाटक 

2

वंडसे(कुंदापूर,ऊडूपी ,)

0.75

6

आरोग्यपूर्ण पंचायत 

केरळ

3

 

निरानाम (पुलीकीझू , पाठनाम्थीट्टा, )

0.25

7

आरोग्यपूर्ण पंचायत 

ओदिशा

3

 

पोटलाम्पूर

(छत्रपूर,गंजम )

0.25

8

बालविकासानुकूल पंचायत 

महाराष्ट्र 

1

ईटगाव (पू) (भंडारा, भंडारा)

1.00

9

बालक अनुकूल पंचायत 

कर्नाटक 

2

हलनायकनहल्ली(बेंगलुरू पूर्व  बेंगलुरू शहर)

0.75

10

बालक अनुकूल पंचायत 

केरळ 

3

ऊट्टूर(वरकाला, थिरुवअनंतपूरम)

0.50

11

परीपूर्ण जल आपूर्ति पंचायत

परीपूर्ण जल आपूर्ति पंचायत 

परीपूर्ण जल आपूर्ति पंचायत 

महाराष्ट्र 

1

 

खारीवली (खालापूर,  रायगड)

1.00

12

परीपूर्ण जल आपूर्ति पंचायत 

कर्नाटक 

2

मदमक्की(हेबरी ,उडूपी)

0.75

13

परीपूर्ण जल आपूर्ति पंचायत 

 

ओदिशा 

3

 

पदुआ (चंपुआ,केंदुझार)

0.50

14

 

स्वच्छ आणि हरीत पंचायत 

मिझोरम 

1

 

कवरथा उत्तर 

1.00

15

स्वच्छ आणि हरीत पंचायत

आसाम 

2

 

जुमारमूर(कथियाटोली नागाव)

0.375

16

स्वच्छ आणि हरीत पंचायत

ओदिशा

2

 

हाथिबंद (लाठीकाटा सुंदरगड,)

0.375

17

स्वच्छ आणि हरीत पंचायत 

छत्तीसगड

3

 

 

सार्डिह(बागिचा जैशपूर)

0.25

18

स्वच्छ आणि हरीत पंचायत

हिमाचल प्रदेश 

3

 

लोहार्डी(बाल्ह,मंडी)

0.25

19

स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त पंचायत 

स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त पंचायत 

 

स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त पंचायत 

 

केरळ

1

 

मेलुकाऊ (इराटुपेट्टा,(कोट्टायम )

1.00

20

स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा युक्त पंचायत 

स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा युक्त पंचायत 

आंध्रप्रदेश 

आसाम 

2

हुग्रीजन (तेंगाखाट,दिब्रुगड)

0.75

21

स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त पंचायत 

 

3

गुंडामाला (कोठा पाटनम, प्रकासम)

0.25

22

स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त पंचायत 

कर्नाटक 

3

सानूर(कारकल, उडुपी)

0.25

23

सामाजिक न्याय आणि सुरक्षा युक्त पंचायत 

हिमाचल प्रदेश 

1

 

शान्षा  (लाहौल, लाहौल  आणि स्पिती)

 

 

 

 

1.00

24

  सामाजिक न्याय आणि सुरक्षा युक्त पंचायत 

 

महाराष्ट्र

2

चांभर्ली(खालापूर रायगड )

0.375

25

सामाजिक न्याय आणि सुरक्षा युक्त पंचायत 

ओदिशा 

2

मंदार(पोलोसारा गंजम )

0.375

26

सामाजिक न्याय आणि सुरक्षा युक्त पंचायत 

 

जम्मू आणि काश्मीर

3

 

वागुरा(बी.के.पोरा,बडगाम )

0.25

27

सामाजिक न्याय आणि सुरक्षा युक्त पंचायत 

कर्नाटक 

Andhra Pradesh

3

हकलाडी (कुंदापूरा, उडूपी)

0.25

28

सुशासनयुक्त पंचायत 

 

1

शृंगावरम (नाथावरम, विशाखापट्टणम)

1.00

29

सुशासनयुक्त पंचायत 

महाराष्ट्र 

2

 

निंबाळे (चांदवड, नाशिक )

0.75

30

सुशासनयुक्त पंमहिलाचायत 

तेलंगणा 

3

  मोथुकुपल्ली

(कोतेपणल्ली, )

0.50

31

  महिला स्नेही पंचायत 

आंध्रप्रदेश

1

बोकासेम पाले, श्रीकालहस्ती तिरुपती)

1.00

32

महिला स्नेही पंचायत 

महिला स्नेही पंचायत 

महिला स्नेही पंचायत 

झारखंड 

2

झिकारहाटी  पूर्व पाकूर  (पाकूर)

0.75

33

महिला स्नेही पंचायत 

तेलंगणा 

3

फासलवाडी (सांगारेड्डी, सांगारेड्डी)

0.25

34

महिला स्नेही पंचायत 

त्रिपुरा 

3

बैकुंठपूर  (हेजामरा, पश्चिम त्रिपुरा )

0.25

  नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत निरंतर विकास पुरस्कार –2025

 

अनुक्रमांक 

पुरस्कार संकल्पना/श्रेणी

 

राज्य/ केंद्रशासित प्रदेश 

श्रेणी

पुरस्कार प्राप्‍त पंचायत

पुरस्कारार्थ मिळणारा निधि (₹ कोटी)

35

 

सर्वोत्तम जिल्हा 

पंचायत 

त्रिपुरा 

1

सेपाहिझाला 

5.00

36

सर्वोत्तम जिल्हा 

पंचायत 

ओदिशा

2

गंजम

3.00

37

सर्वोत्तम जिल्हा 

पंचायत 

तामिळनाडू 

3

कोईमतूर

2.00

38

सर्वोत्तम जिल्हा 

पंचायत 

केरळ 

1

 

हरिप्पद (अलाप्पुझ्हा )

2.00

39

सर्वोत्तम तालुका पंचायत

आंध्र प्रदेश 

3

  कुप्पम(चित्तूर)

1.50

40

सर्वोत्तम जिल्हा 

पंचायत 

आसाम

1

न्यू नापम (गाभोरु,सोनितपूर)

1.50

41

सर्वोत्तम जिल्हा 

पंचायत 

बिहार 

2

तेलकूप  (Rohtas, Rohtas)

1.25

42

सर्वोत्तम जिल्हा 

पंचायत 

उत्तर प्रदेश 

3

बिराहारू  (सैंया, आग्रा )

1.00

 

***

सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/संपदा पातगोंकार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2259483) अभ्यागत कक्ष : 14