भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026


ECINET वर प्रकाशित इंडेक्स कार्ड आणि सांख्यिकीय अहवाल

Posted On: 08 MAY 2026 4:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 मे 2026

 

  1. भारतीय निवडणूक आयोगाने 6 मे 2026 रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026 बद्दल माहिती देणारे इंडेक्स कार्ड आणि सांख्यिकीय अहवाल, ECINET वर प्रकाशित केले आहे. या अहवालांमध्ये जिथे जिथे निवडणुका झाल्या त्या 830 विधानसभा मतदारसंघांचे इंडेक्स कार्ड आणि सांख्यिकीय अहवाल प्रकाशित करण्यात आले आहेत. पश्चिम बंगालच्या 144-फाल्टा विधानसभा मतदारसंघात 21मे 2026 रोजी फेरमतदान होणार आहे.
  2. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका यांचे इंडेक्स कार्ड्स निकाल जाहीर झाल्याच्या 72 तासांच्या इतक्या विक्रमी वेळेत उपलब्ध करण्यात आली. डिजिटल माहिती उपलब्ध आणि इंडेक्स कार्ड्स तसेच सांख्यिकीय अहवाल करुन देणे हे उपक्रम म्हणजे निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी सुरु केलेल्या 30 पेक्षा अधिक उपक्रमांपैकी एक आहेत.  ECINET चा अवलंब करण्यापूर्वी क्षेत्रीय अधिकारी स्वतः ही माहिती भरत असल्याने त्याच्या संकलनासाठी कित्येक आठवड्यांपासून ते महिन्यांपर्यंतचा कालावधी जात असे.
  3. इंडेक्स कार्डमध्ये उमेदवार, मतदार, किती मतदान झाले, पक्षनिहाय आणि उमेदवार निहाय मतदानाची आकडेवारी अशी विविध प्रकारची माहिती दिलेली असते. या इंडेक्स कार्ड मधील माहिती  ECINET ॲप (निवडणुकांविषयी टॅब → चालू निवडणुका → निर्देशांक पत्रिका) आणि https://www.eci.gov.in/statistical-reports या ECI च्या अधिकृत वेबसाइटवर देखील मिळू शकते.
  4. भारतीय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांसाठी एकाच वेळी 14 सांख्यिकीय अहवालांचा संच प्रकाशित केला आहे. मतदानाचा निकाल जाहीर झाल्यानंतर 72 तासांच्या आत सांख्यिकी अहवाल प्रकाशित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  5. सांख्यिकीय अहवालांमध्ये राज्यस्तरीय आणि मतदारसंघ-स्तरीय मतदार, मतदानकेंद्रांची संख्या, राज्य/मतदारसंघ निहाय मतदानाची आकडेवारी, लिंगनिहाय सहभाग, पक्ष निहाय मतदानाचे प्रमाण, मतदारसंघ सारांश अहवाल, मतदारसंघ निहाय निकाल आणि इतर काही मुद्दे अशा विविध प्रकारच्या घटकांबद्दल माहिती दिलेली असते.
  6. सांख्यिकीय अहवालांचे प्रकाशन हा शिक्षण क्षेत्र, संशोधक आणि सर्वसामान्य जनता यांसारख्या सर्व हितधारकांसाठी निवडणूक आयोगाचा एक स्वयंस्फूर्त उपक्रम आहे, ज्याद्वारे निवडणुकीशी संबंधित माहितीची पारदर्शकता आणि सुलभता वाढवली जाते. हे अहवाल इंडेक्स कार्डमध्ये भरलेल्या दुय्यम माहितीच्या आधारे तयार केले जातात.
  7. प्राथमिक माहिती संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी जपलेल्या वैधानिक नमुन्यांमध्ये आहे आणि वैधानिक नमुन्यांमध्ये ठेवलेली माहिती अंतिम मानली जाईल.

 

* * *

नेहा कुलकर्णी/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2259087) अभ्यागत कक्ष : 24