गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मिशन दृष्टीची यशस्वी निर्मिती केल्याबद्दल गॅलक्सी आय मधील तरुण शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 03 MAY 2026 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 मे 2026

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मिशन दृष्टीची यशस्वी निर्मिती केल्याबद्दल गॅलक्सी आय मधील तरुण शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे. हा जगातील पहिला आॅप्टोसार उपग्रह असून त्यात ऑप्टिकल कॅमेरा आणि सर्व हवामानात कार्य करणारे रडार यांचा समावेश आहे.

एक्स या मंचावरील आपल्या संदेशामध्ये अमित शाह म्हणाले, “गॅलक्सीआय मधील आपल्या तरुण शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे  मिशन दृष्टीच्या यशस्वी निर्मितीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. ऑप्टिकल कॅमेरे आणि सर्व हवामानात कार्य करणारे रडार यांचा समावेश असलेला हा जगातील पहिला आॅप्टोसार उपग्रह आहे. भारतातील खाजगी क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या उपग्रहाचे प्रक्षेपण पृथ्वीचे निरीक्षण करण्याची पद्धत बदलून टाकेल आणि आपल्या तरुणांच्या सामर्थ्याची छाप जागतिक पातळीवर उमटवेल. या माध्यमातून भारताला अंतरिक्ष शक्ती बनवण्याच्या मोदीजींच्या संकल्पनेची पूर्तता होईल. तुमच्या भावी उपक्रमांसाठी माझ्या शुभेच्छा.”

 

* * *

सुषमा काणे/नितीन गायकवाड/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2257705) आगंतुक पटल : 65
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Telugu , Kannada