पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश मधील धार येथे झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले


पंतप्रधानांनी पीएमएनआरएफ मधून आर्थिक मदत केली जाहीर

Posted On: 29 APR 2026 11:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 एप्रिल 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश मधील धार येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.

या दु:खद घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले आहे, तर जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे वाटावी अशी प्रार्थना केली आहे.

या अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये, तर जखमी लोकांसाठी 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे :

मध्य प्रदेश मधील धार येथे  झालेल्या अपघातातील जीवितहानीचे वृत्त ऐकून व्यथित झालो. या दु:खद घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. तसेच, अपघातातील जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना करतो.

या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफ अंतर्गत प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाईल” पंतप्रधान @narendramodi”

 

* * *

नेहा कुलकर्णी/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2256944) अभ्यागत कक्ष : 9