गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
Posted On:
22 APR 2026 10:05AM by PIB Mumbai
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी या हल्ल्यातील पीडितांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या प्रियजनांना गमावल्याचे दुःख आणि वेदना आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
'एक्स' या समाज माध्यमवरील एका पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की,
"गेल्या वर्षी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात ज्या निष्पाप जीवांनी आपले प्राण गमावले, त्यांचे आज आम्ही अत्यंत जड अंतःकरणाने स्मरण करत आहोत. आपल्या माणसांना गमावल्याचे दुःख आणि त्या जखमा आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात ताज्या आहेत. दहशतवाद हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू असून, त्याविरुद्ध आपण सर्वांनी एकजुटीने लढा देऊन त्याचा बिमोड करणे काळाची गरज आहे. दहशतवाद आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांविरुद्ध भारत आपले 'शून्य सहिष्णुता' धोरण यापुढेही ठामपणे सुरूच ठेवेल."
***
NehaKulkarni / VaibhaviJoshi / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2254382)
अभ्यागत कक्ष : 9