गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सनातन संस्कृतीचे प्राणशक्तीस्थान असलेल्या जगद्गुरु आदि शंकराचार्यजींच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना दिल्या हार्दिक शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 21 APR 2026 5:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2026

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सनातन संस्कृतीचे प्राणशक्तीस्थान असलेल्या जगद्गुरु आदि शंकराचार्यजींच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत‌.

एक्स वरील एका पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले, “सनातन संस्कृतीचे प्राणस्वरूप, जगद्गुरु आदि शंकराचार्यजी यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशबांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा. ज्या काळात भारत अनेक प्रकारच्या कठोर बंधनांनी ग्रासलेला होता आणि आपल्या धर्मावर व संस्कृतीवर सतत हल्ले होत होते, त्या काळात त्यांनी समाजाला सत्याचे दर्शन घडवण्यासाठी अद्वैत वेदान्ताचा मार्ग प्रशस्त केला. संपूर्ण राष्ट्रात सनातन धर्माचा झेंडा पुन्हा एकदा उंच फडकवण्यासाठी, संस्कृतीचे जतन करण्यासाठी आणि देशाला एकतेच्या धाग्यात गुंफण्यासाठी त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केली आणि चारही दिशांना चार मठांची स्थापना केली. आपल्या अल्पायुष्यातही वेद आणि धर्मग्रंथांचे सखोल ज्ञान आत्मसात करून त्यांनी उपनिषदांवर सोपी आणि सुबोध टिप्पणी केली  ज्यामुळे समाज पुन्हा एकदा वैदिक ज्ञानाच्या मार्गावर पुढे गेला. आदि शंकराचार्यजींच्या ज्ञान आणि दूरदृष्टीमुळेच आपली संस्कृती नव्याने बहरली आणि समृद्ध झाली. मी आदि शंकरजींना वंदन करतो.”  

सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर‍

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2254215) आगंतुक पटल : 29
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Kannada