रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेकडून उन्हाळी सुटीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत होणाऱ्या गर्दीत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण देशात 18262 उन्हाळी विशेष रेल्वे फेऱ्या


गर्दीच्या हंगामात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी 11294 फेऱ्यांची आधीच घोषणा

मध्य रेल्वे (3082 फेऱ्या), पूर्व मध्य रेल्वे (2711 फेऱ्या) आणि उत्तर पश्चिम रेल्वे (2245 फेऱ्या) हे विभाग सर्वाधिक उन्हाळी विशेष रेल्वे फेऱ्या चालवणारे प्रमुख विभाग ठरले आहेत

Posted On: 20 APR 2026 5:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 एप्रिल 2026

 

उन्हाळी सुटीच्या हंगामात प्रवाशांच्या मागणीत होणारी अपेक्षित वाढ लक्षात घेऊन प्रवासाचा सुखद अनुभव देण्याच्या दृष्टीने, भारतीय रेल्वे 2026 च्या उन्हाळी हंगामात विशेष रेल्वे गाड्या चालवत आहे. उन्हाळ्याच्या गर्दीच्या हंगामात प्रवाशांना सुखद आणि आरामदायी प्रवास मिळावा यासाठी, रेल्वे प्रशासनाने देशभरात मोठ्या संख्येने विशेष रेल्वे सेवांना मंजुरी देऊन महत्त्वपूर्ण पावले टाकली आहेत. 15 एप्रिल 2026 ते 15 जुलै 2026 या कालावधीसाठी, एकूण 908 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे; प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी या गाड्यांच्या एकूण 18262 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. यापैकी, 660 गाड्यांबाबतची सूचना आधीच जारी करण्यात आली असून त्यात 11294 फेऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळेआधीच आपले आरक्षण आणि प्रवासाचे नियोजन करणे शक्य झाले आहे. रेल्वेचे हे व्यवस्थान सुट्ट्या, सण-उत्सव आणि गर्दीच्या महिन्यांमध्ये होणाऱ्या हंगामी गर्दीचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात भारतीय रेल्वेचा सक्रिय दृष्टिकोन दाखवत आहे.

विभागनिहाय तपशील

  • उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांचे संचालन भारतीय रेल्वेच्या सर्व प्रमुख विभागांमध्ये विस्तारलेले आहे, त्यामुळे संतुलित प्रादेशिक संपर्क आणि प्रवाशांचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने होऊ शकते.
  • पश्चिम रेल्वेने 106 गाड्यांना (2,078 फेऱ्या) मंजुरी दिली असून, त्यापैकी ९2 गाड्यांची (1,667 फेऱ्या) सूचना जारी करण्यात आली आहे.
  • मध्य रेल्वेने 74 गाड्यांना (3,082 फेऱ्या) मंजुरी दिली असून, त्यापैकी 70 गाड्यांची (2,238 फेऱ्या) सूचना जारी करण्यात आली आहे.
  • दक्षिण रेल्वेने 72 गाड्यांना (558 फेऱ्या) मंजुरी दिली असून, त्यापैकी 38 गाड्यांची (133 फेऱ्या) सूचना जारी करण्यात आली आहे.

प्रवाशांची मागणी अधिक असलेल्या मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या सोडून भारतीय रेल्वे उन्हाळ्याच्या गर्दीच्या काळात प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल याचे नियोजन करत आहे. मोठ्या प्रमाणात विशेष रेल्वेगाड्या सोडून भारतीय रेल्वे प्रवाशांची सोय आणि सुखकर प्रवासाला सातत्याने प्राधान्य दिले जात आहे.

 

 

 

* * *

राधिका अघोर/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2253829) अभ्यागत कक्ष : 47