पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी कर्नाटकला भेट दिली, श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन केले आणि भेटीची क्षणचित्रे सामाईक केली

प्रविष्टि तिथि: 15 APR 2026 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या कर्नाटक दौऱ्याची क्षणचित्रे सामाईक केली.

कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील श्री आदिचुंचनगिरी महासंस्थान मठात श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

हे पवित्र स्थळ, देशाची कालातीत अध्यात्मिक मूल्य, तसेच सेवा आणि विवेकाच्या चिरंतन परंपरांना अभिवादन असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी ज्वाला पीठ येथे भेट दिली आणि श्री कालभैरव मंदिरात प्रार्थना केली.

त्यांनी जगद्गुरू परमपूज्य श्री श्री श्री डॉ.बालगंगाधरनाथ महास्वामीजी यांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान म्हणाले की, ते अध्यात्मिकता आणि सेवेचा दीपस्तंभ आहेत, त्यांच्या सामाजिक सक्षमीकरणाच्या प्रशंसनीय प्रयत्नांनी जगभरातील असंख्य लोकांच्या जीवनाला स्पर्श केला.

X वरील पोस्ट्सच्या मालिकेत मोदी म्हणाले:

“आज सकाळी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील श्री आदिचुंचनगिरी महासंस्थान मठात श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन केले.

हे पवित्र स्थान आपल्या भूमीच्या चिरंतन अध्यात्मिक परंपरा, सेवा आणि विवेकाच्या चिरस्थायी परंपरांना अभिवादन आहे."

"श्री आदिचुंचनगिरी महासंस्थान मठात ज्वाला पीठाला भेट दिली आणि श्री कालभैरव मंदिरात प्रार्थना केली."

“जगद्गुरू परमपूज्य श्री श्री श्री डॉ.बालगंगाधरनाथ महास्वामीजी यांना आदरांजली वाहिली. ते अध्यात्म आणि सेवेचे दीपस्तंभ आहेत, सामाजिक सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. त्यांच्या कार्याने जगभरातील असंख्य लोकांचे जीवन उजळले.”

निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2252336) आगंतुक पटल : 46
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam