पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा
दोन्ही देशांतील परस्पर सहकार्य आणि पश्चिम आशियातील युद्धस्थिती तसेत होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या स्थितीचा घेतला आढावा
प्रविष्टि तिथि:
14 APR 2026 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2026
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज दूरध्वनीवरुन संवाद साधला.
यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला, तसेच सर्व क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
यावेळी त्यांनी पश्चिम आशियातील संघर्ष आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित करण्याविषयीही चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर लिहिले आहे की,
“माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज माझ्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. आम्ही विविध क्षेत्रातील आमच्या द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. आमची जागतिक स्तरावरील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. पश्चिम आशियातील संघर्षाच्या स्थितीबाबत आम्ही चर्चा केली आणि होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली आणि सुरक्षित असण्याच्या महत्त्वावर भर दिला.
@POTUS
@realDonaldTrump”
* * *
माधुरी पांगे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2252001)
आगंतुक पटल : 49
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam