पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

छत्तीसगडमध्ये शक्ती जिल्ह्यातील उर्जा प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले


पंतप्रधानांतर्फे सानुग्रह मदतीची घोषणा

Posted On: 14 APR 2026 9:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 एप्रिल 2026

 

छत्तीसगडमध्ये शक्ती जिल्ह्यातील उर्जा प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या दुर्घटनेत ज्यांनी स्वतःचे प्रियजन गमावले, त्यांच्या प्रती पंतप्रधानांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून जखमी झालेल्या व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना केली आहे. या घटनेमुळे प्रभावित झालेल्यांना स्थानिक प्रशासनातर्फे मदत केली जात आहे, हे देखील त्यांनी नमूद केले.

या घटनेत जीव गमावलेल्यांच्या जवळच्या व्यक्तीला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपये सानुग्रह मदत देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. जखमी व्यक्तींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत देण्यात येईल.

X मंचावरील संदेशात पंतप्रधान म्हणतात;

“छत्तीसगडमध्ये शक्ती जिल्ह्यातील उर्जा प्रकल्पात झालेली दुर्घटना भीषण आहे. यामध्ये ज्यांनी जीव गमावले, त्यांच्या प्रियजनांसोबत माझ्या संवेदना आहेत. यात जखमी झालेल्यांना लवकर बरे वाटो. प्रभावित झालेल्यांना स्थानिक प्रशासनाकडून मदत करण्यात येत आहे.

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या जवळच्या व्यक्तीला पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात येईल. जखमी व्यक्तींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येतील:पंतप्रधान @narendramodi”

 

* * *

माधुरी पांगे/संजना चिटणीस/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2251986) अभ्यागत कक्ष : 9