गृह मंत्रालय
प्रख्यात गायिका आशा भोसलेजी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्त
प्रविष्टि तिथि:
12 APR 2026 2:43PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रख्यात गायिका आशा भोसलेजी यांच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांप्रति आणि असंख्य चाहत्यांप्रती सखोल शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
एक्स या मंचावरील आपल्या शोकसंदेशात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले की, आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी, विशेषतः माझ्यासारख्या प्रत्येक संगीतप्रेमीसाठी दुःखद आहे, कारण आपल्या सर्वांच्या लाडक्या आशा भोसलेजी आता आपल्या सोबत नाहीत. त्यांनी नमुद केले की, आशाताईंनी आपल्या मधुर आवाज आणि अतुलनीय प्रतिभेच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीच, पण आपल्या सुरांनी भारतीय संगीत अधिक समृद्ध केले. त्यांनी म्हटले आहे की, संगीताच्या प्रत्येक प्रकाराशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या अद्वितीय क्षमतेमुळे त्यांना ऐकणाऱ्या सर्वांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले.
शाह म्हणाले की, आपल्या आवाजाने कोट्यवधी हृदयांना स्पर्श करणाऱ्या आशा जी यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ आणि गुजराती अशा अनेक भाषांमध्ये तसेच लोकसंगीत क्षेत्रात अमिट ठसा उमटवला. त्यांनी सांगितले की, आशा ताईंच्या स्वभावातील साधेपणा आणि आत्मीयता त्यांच्या आवाजातील कोमलतेइतकीच गहन होती. ते म्हणाले की, जेव्हा-जेव्हा आमची भेट होत असे, तेव्हा संगीत आणि कलेसारख्या विविध विषयांवर आम्ही दीर्घ चर्चा करत असू.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, त्या आज आपल्या सोबत नसल्या तरी त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून त्या सदैव आपल्या हृदयात जिवंत राहतील. मी त्यांच्या कुटुंबीयांप्रति आणि असंख्य चाहत्यांप्रती माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती, शांती, शांती.
***
सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2251274)
आगंतुक पटल : 57