MIFF banner

माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांसाठीच्या 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (मिफ्फ) 15 ते 21 जून 2026 या कालावधीत एनएफडीसी संकुल, मुंबई येथे होणार आयोजन

19 व्या मिफ्फ साठी चित्रपट प्रवेशिका स्वीकारण्यास झाली सुरुवात प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 12 एप्रिल 2026

मिफ सोबतच वेव्हज् डॉक बाजारच्या दुसऱ्या आवृत्तीचे 16 ते 18 जून 2026 रोजी होणार आयोजन

 

माहितीपट, लघुपट आणि ऍनिमेशन चित्रपटांसाठीचा 19 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ), हा महोत्सव 15 ते 21 जून 2026 या कालावधीत मुंबईतील एनएफडीसी संकुलात आयोजित केला जाणार आहे.

हा महोत्सव भारतातील आणि जगभरातील माहितीपट निर्माते, चित्रपट व्यावसायिक, सिनेप्रेमी, लेखक, शैक्षणिक तज्ज्ञ, समीक्षक, पत्रकार, विद्यार्थी आणि या महोत्सवासाठी आतुर असलेल्या व्यक्तींना या सिनेमॅटिक प्लॅटफॉर्मवरील चेतनादायी वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी आमंत्रित करत आहे.

सध्या, स्पर्धा विभागात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ऑनलाइन प्रवेशिका स्वीकारणे सुरू आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2026 आहे. निर्माते, वितरक, हक्क धारक किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी केवळ 'फिल्म फ्रीवे' (https://filmfreeway.com/MumbaiInternationalFilmFestival-MIFF) या प्लॅटफॉर्मद्वारे नियम वाचून आपल्या चित्रपटांच्या प्रवेशिका पाठवू शकतात. ऑफलाइन पद्धतीने कोणत्याही प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या मिफमध्ये, नॉन-फीचर फिल्म विभागात सर्वात आकर्षक पुरस्कार प्रदान करण्याची मालिका पुढे सुरूच राहणार असून, यामध्ये एकूण 55 लाख रुपयांची रोख पारितोषिके  आहेत. सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीच्या प्रतिष्ठित 'सुवर्ण शंख' (Golden Conch) पुरस्कारासोबत 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. हा महोत्सव नेटवर्किंग आणि सह-निर्मितीच्या संधींसाठी एक मौल्यवान व्यासपीठ देखील उपलब्ध करून देत आहे.

16 ते 18 जून 2026 दरम्यान नियोजित असलेली ' वेव्हज डॉक बाजार' ची दुसरी आवृत्ती हे मिफ 2026 चे एक प्रमुख आकर्षण असेल. या डॉक बाजारमध्ये को-प्रोडक्शन मार्केट, व्ह्यूइंग रूम आणि वर्क इन प्रोग्रेस लॅबसह अनेक विभाग असतील. माहितीपट निर्मिती, उत्पादन आणि वितरणामध्ये सहकार्य आणि नावीन्य वाढवण्यासोबतच, नॉन-फीचर चित्रपटांच्या जागतिक खरेदीदार आणि विक्रेत्यांमधील संबंध सुलभ करणे हे याचे उद्दिष्ट आहे. वेव्हज डॉक बाजारमधील सहभागाबाबत अधिक तपशील लवकरच अधिकृत मिफ वेबसाइटवर जाहीर केले जातील. इच्छुकांनी https://miff.in/en/waves-doc-bazaar/about-waves-doc-bazaar यावर लक्ष ठेवावे.

1990 मध्ये स्थापन झालेला मिफ्फ हा दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि मोठा नॉन-फीचर चित्रपट महोत्सव आहे आणि दर दोन वर्षांनी त्याचे आयोजन करण्यात येते. अनेक वर्षांपासून, या महोत्सवाने माहितीपट, लघुपट आणि ऍनिमेशन चित्रपट निर्मितीमधील उत्कृष्टतेचे प्रदर्शन करण्यासाठी जगभरातील चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करून मोठी प्रतिष्ठा मिळवली आहे.

मिफ च्या 18 व्या आवृत्तीला उदंड प्रतिसाद मिळाला होता, ज्यामध्ये 30 पेक्षा जास्त देशांतील 350 हून अधिक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले होते. महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभाग, पुरस्कार विजेते चित्रपट, पुनर्संचयित क्लासिक्स आणि विशेष रचना केलेले संकल्पनाधारित विभाग यांचा समावेश होता.

अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी miff.india@nfdcindia.com वर संपर्क साधा किंवा www.miff.in ला भेट द्या.

***

नेहा कुलकर्णी / शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2250751   |   Visitor Counter: 127