पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान ​नरेंद्र मोदी यांनी कायदे मंडळांमधील महिला आरक्षणावर लिहिलेल्या लेखातील काही ठळक मुद्दे केले सामायिक

Posted On: 09 APR 2026 4:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2026

पंतप्रधान ​नरेंद्र मोदी यांनी कायदे मंडळांमधील महिला आरक्षणावर लिहिलेल्या ओप-एड  लेखातील काही ठळक मुद्दे आज समाज माध्यमावर सामायिक केले आहेत. हे केवळ एक वैधानिक कामकाज नसून भारताच्या महिला शक्तीच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर सामायिक केलेली संदेश मालिका :

पंतप्रधान @narendramodi यांनी कायदे मंडळांमधील महिला आरक्षणावर एक लेख लिहिला आहे. हे केवळ एक वैधानिक कामकाज नसून भारताच्या महिला शक्तीच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे असे त्यांनी म्हटले आहे.

या संदेश मालिकेत लेखातील ठळक मुद्दे अधोरेखित केले आहेत.

जेव्हा महिलांची प्रगती होते,तेव्हा समाजाचीही प्रगती होते.

आर्थिक आणि सामाजिक जीवनातील महिलांच्या सहभागाचा पाया अधिक मजबूत करत आहोत.

जेव्हा महिला प्रशासन आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या स्वतःसोबत सार्वजनिक मतप्रवाह अधिक समृद्ध करणारे आणि प्रशासनाचा दर्जा सुधारणारे असे अनुभव आणि अंतर्दृष्टी घेऊन येत असतात.

2029 च्या लोकसभा निवडणुका त्याचबरोबर  विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका या महिला आरक्षणासह होणे अत्यंत गरजेचे आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये, संसदेने सर्वसंमतीने नारी शक्ती वंदन अधिनियम संमत केला.

महिलांच्या प्रतिनिधित्वाला पुढे नेण्यासाठी होणारा प्रत्येक विलंब, म्हणजे खरे तर आपल्या लोकशाहीची गुणवत्ता आणि सर्वसमावेशकता मजबूत करण्याला होणारा विलंब ठरेल.

महिला आरक्षणासंबंधीचे विधेयक मंजूर होताना त्यातून व्यापक सहमती प्रतिबिंबीत व्हायला हवी आणि त्यामागे व्यापक राष्ट्र हिताची प्रेरणा असायला हवी.

चला, आपण एकत्र पुढे वाटचाल करू या आणि घटनात्मक मूल्यांना बळकटी देऊ या, तसेच राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपल्या महिला शक्तीला सक्षम करू या.


निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2250501) अभ्यागत कक्ष : 27