संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जनरल फॅन व्हॅन गियांग यांची व्हिएतनामचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी केले अभिनंदन


भारत व्हिएतनामसोबतचे दीर्घकालीन संरक्षण संबंध आणखी दृढ करण्यास उत्सुक आहे : राजनाथ सिंह

प्रविष्टि तिथि: 09 APR 2026 2:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2026

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, व्हिएतनामचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल जनरल फॅन व्हॅन गियांग यांचे अभिनंदन केले आहे.

यासंदर्भात एक्स या समाजमाध्यमावरच्या संदेशात संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले की,भारत व्हिएतनामसोबतचे आपले जुने संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यास आणि सुरक्षा,लष्करी देवाणघेवाण तसेच उद्योग क्षेत्रातील सहकार्य अधिक व्यापक करण्यास उत्सुक आहे. येणाऱ्या काळात भारत-व्हिएतनाम भागीदारी उत्तरोत्तर प्रबळ होत जाईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2250424) आगंतुक पटल : 61
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Punjabi , Gujarati , Telugu , Kannada