आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
अरुणाचल प्रदेशातील अंजॉ जिल्ह्यात 1200 मेगावॅट क्षमतेच्या कलाई-2 जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीसाठी 14105.83 कोटी रुपयांच्या खर्चाच्या गुंतवणूक प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
Posted On:
08 APR 2026 5:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने अरुणाचल प्रदेशातील अंजॉ जिल्ह्यातील लोहित नदीवर कलाई-2 जलविद्युत प्रकल्पाच्या (एचईपी) बांधकामासाठी 14105.83 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाजित कालावधी 78 महिन्यांचा आहे.
1200 मेगावॅट (6 x 190 मेगावॅट आणि 1 x 60 मेगावॅट) स्थापित क्षमतेच्या या प्रकल्पातून वार्षिक 4852.95 दशलक्ष युनिट ऊर्जा निर्माण होण्याची अपेक्षा आहे. लोहित खोऱ्यातील पहिला जलविद्युत प्रकल्प असल्याने तो राज्यातील वीजपुरवठा मजबूत करेल, मागणीच्या उच्चांकी वेळेचे व्यवस्थापन करण्यास मदत करेल आणि राष्ट्रीय ग्रीड संतुलित ठेवण्यास हातभार लावेल.
हा प्रकल्प टीएचडीसी इंडिया लिमिटेड आणि अरुणाचल प्रदेश सरकार यांच्या संयुक्त उपक्रम कंपनीमार्फत राबविण्यात येईल. सक्षम पायाभूत सुविधांअंतर्गत रस्ते, पूल आणि संबंधित पारेषण वाहिनीच्या बांधकामासाठी भारत सरकार ₹599.88 कोटींचे अर्थसंकल्पीय सहाय्य देईल, तसेच राज्याच्या समभाग हिश्श्यासाठी ₹750 कोटींचे केंद्रीय वित्तीय सहाय्यही दिले जाईल.
या प्रकल्पांतर्गत अरुणाचल प्रदेशातील नामसाई आणि अंजॉ जिल्ह्यांमधील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल, ज्यामध्ये सुमारे 29 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा आणि पुलांचा विकास समाविष्ट आहे. हे रस्ते आणि पूल प्रामुख्याने स्थानिक वापरासाठी उपलब्ध असतील. तसेच स्थानिक लोकांना विविध प्रकारची भरपाई, रोजगार आणि सीएसआर उपक्रमांमधूनही फायदा होईल.
नेहा कुलकर्णी/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2250143)
अभ्यागत कक्ष : 21