गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय स्वाभिमानाचे अजरामर प्रतीक आणि राष्ट्रगौरवाचे रक्षक असल्याचे गौरवोद्गार
समुद्रसुरक्षेची दूरदृष्टी ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले सक्षम आरमार त्यांच्या अद्वितीय धोरण आणि दूरदर्शी नेतृत्वाचे दर्शन घडवते
Posted On:
03 APR 2026 11:15AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 एप्रिल 2025
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले.
'एक्स' वरील एका संदेशात अमित शाह यांनी म्हटले आहे की,
भारतीय स्वाभिमानाचे अजरामर प्रतीक आणि राष्ट्रगौरवाचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण करून मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी लोकसंघटन केले आणि हिंदवी स्वराज'ची स्थापना केली. समुद्रावरील नियंत्रणाचे महत्त्व ओळखून त्यांनी उभारलेले शक्तिशाली आरमार, त्यांच्या अद्वितीय धोरणाचे आणि दूरदर्शी नेतृत्वाचे दर्शन घडवते. एक राजा आपल्या संस्कृतीचे आणि भाषेचे रक्षण करण्यासोबतच लोककल्याणाचे आदर्श कसे उभे करू शकतो, यासाठी त्यांचे जीवन एक उत्तम उदाहरण आहे. त्यांचा अखंड संघर्ष आणि जीवनगाथा देशाला मातृभूमीप्रती समर्पित राहण्याची प्रेरणा कायम देत राहील.
नितीन फुल्लुके /राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2248748)
अभ्यागत कक्ष : 26