पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी  स्वगणना प्रक्रिया केली पूर्ण, भारतातील नागरिकांना त्यांच्या कुटुंबाची माहिती  स्वतः भरण्याचे आणि जनगणना प्रक्रियेत सहभागी होण्याचे केले आवाहन

Posted On: 01 APR 2026 8:12PM by PIB Mumbai


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वगणना प्रक्रिया  पूर्ण केली.  जनगणना 2027  च्या पहिल्या टप्प्याला आज सुरुवात झाली. हा टप्पा घरांची यादी आणि गृहनिर्माण कार्यांशी संबंधित  आहे. मोदी म्हणाले की, या जनगणनेत प्रथमच डिजिटल माध्यमांद्वारे माहिती संकलन केले जात आहे. यामुळे भारतातील जनतेला त्यांच्या कुटुंबाचा तपशील स्वतः भरण्याचे सामर्थ्य मिळणार आहे.

मोदींनी भारतातील लोकांना त्यांच्या कुटुंबाची माहिती  स्वतः भरण्याचे आणि जनगणना प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले;
मी माझी स्व-गणना पूर्ण केली आहे.
आज जनगणना  2027 च्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे, जो घरांची यादी आणि गृहनिर्माण कार्यांशी संबंधित आहे. या जनगणनेत प्रथमच डिजिटल माध्यमांद्वारे माहिती संकलन केले जात आहे. यामुळे भारतातील नागरिकांना  त्यांच्या कुटुंबाचा तपशील स्वतः भरता येणार आहे.
मी भारतातील लोकांना आवाहन करतो की, त्यांनी स्वतःच आपल्या कुटुंबाची माहिती भरावी  आणि जनगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे."

***

नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2248055) अभ्यागत कक्ष : 11