पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंतीनिमित्त गांधीनगरमधील कोबा तीर्थ येथे 'सम्राट संप्रति संग्रहालया'च्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणाची क्षणचित्रे केली सामायिक
प्रविष्टि तिथि:
31 MAR 2026 4:48PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंतीनिमित्त गुजरातमधल्या गांधीनगरमधील कोबा तीर्थ येथे 'सम्राट संप्रति संग्रहालया'च्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केली आहेत. ''कोबा तीर्थस्थान आध्यत्मिक शांतीने ओतप्रोत आहे, असे स्थान जिथे अनेक जैन साधुमुनींची तपस्या साकार झाली आहे आणि सर्जन व सेवा नैसर्गिकरित्या उत्कर्ष साधते.
पंतप्रधान मोदी यांनी X वरच्या पोस्ट मालिकेत म्हटले आहे :
''सत्तेला सेवा आणि साधना मानून कार्य करण्याची जी प्रेरणा आपल्याला आपल्या इतिहासातून मिळते, तिचाच अमूल्य वारसा गांधीनगरमधील कोबा तीर्थ येथील सम्राट संप्रती संग्रहालयात जतन करून प्रस्तुत करण्यात आला आहे.''
''आज संपूर्ण जग अस्थिरता आणि अशांतीच्या आगीत होरपळत असताना सम्राट संप्रती संग्रहालयाचा संदेश केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.''
''ताडपत्र आणि भोजपत्रावर लिखित शेकडो वर्षांचे प्राचीन दुर्लभ ज्ञान कोबा तीर्थ येथे संकलित आणि संरक्षित ठेवले आहे. हा प्रयत्न केवळ आपला भूतकाळ आणि वर्तमानकाळ जोडणारा नाही, तर आपल्या भविष्यासाठीदेखील खूप उपयुक्त आहे.''
''नवकार महामंत्र दिवसानिमित्त नवी दिल्ली येथे झालेल्या ऐतिहासिक कार्यक्रमात मी नऊ संकल्पांबाबत बोललो होतो. आज त्यात या दहाव्या संकल्पाचीही आपण सर्वांनी भर घातली आहे.''
***
माधुरी पांगे/सोनाली काकडे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2247344)
आगंतुक पटल : 43
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam