पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान महामहीम प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
28 MAR 2026 10:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान महामहीम प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि पश्चिम आशियात सध्या सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा केली. प्रादेशिक ऊर्जा विषयक पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा भारत निषेध करत असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संवादात पुन्हा एकदा अधोरेखित केली. यासोबतच सागरी जलवाहतुकीच्या स्वातंत्र्याची सुनिश्चिती करण्याची तसेच, सागरी वाहतूक मार्ग खुले आणि सुरक्षित ठेवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. सौदी अरेबियातील भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान देत असलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
"सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान महामहीम प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी संवाद साधला आणि सध्या पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाबद्दल चर्चा केली.
प्रादेशिक ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा भारताने निषेध केल्याची बाब मी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
सागरी जलवाहतुकीचे स्वातंत्र्य सुनिश्चित करणे तसेच सागरी वाहतूक मार्ग खुले आणि सुरक्षित ठेवण्याच्या गरजेवर आम्ही सहमती दर्शवली.
सौदी अरेबियातील भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले."
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2246590)
आगंतुक पटल : 70
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam