गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या निर्णयाबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार

Posted On: 27 MAR 2026 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 मार्च 2026

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शाह यांनी इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

'एक्स' या समाज माध्‍यमावरील एका पोस्टमध्ये केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, “पश्चिम आशियातील संकटामुळे जग इंधन टंचाईचा सामना करत असताना आणि जागतिक स्तरावर किंमती वाढत असताना, मोदी सरकारचा इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय नागरिकांना मोठा दिलासा देणारा आहे. अनेक राष्ट्रांनी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ केली असताना, उत्पादन शुल्क कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय त्यांचे 'लोक-केंद्रित शासन' आणि संवेदनशील निर्णयक्षमतेला अधोरेखित करतो. या निर्णयासाठी पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांचे अभिनंदन.”

 

* * *

सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2246324) अभ्यागत कक्ष : 20