गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडून आसाम रायफल्सच्या वीर जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा

Posted On: 24 MAR 2026 11:11AM by PIB Mumbai

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आसाम रायफल्सच्या वीर जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स या समाज माध्यमावर एका संदेशात केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले, “आसाम रायफल्सच्या वीर जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा. ईशान्येतील आव्हानात्मक भूप्रदेशात ते आपल्या सीमांचे रक्षण करतात, शौर्य आणि देशभक्तीचे प्रतीक साकारतात आणि मानवतावादी दृष्टीकोनातून मदत करून जनसमुदायांत विश्वास निर्माण करतात. राष्ट्रसेवेसाठी प्राण अर्पण केलेल्या आसाम रायफल्सच्या शूर जवानांचे आम्ही स्मरण करतो.”

***

NehaKulkarni / ReshamaBedekar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2244353) अभ्यागत कक्ष : 15