पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली

प्रविष्टि तिथि: 23 MAR 2026 8:01AM by PIB Mumbai

महान समाजवादी नेते आणि विचारवंत डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

डॉ.लोहिया यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून वर्णन करत, वसाहतवादी राजवटीविरुद्ध सामान्य जनतेला संघटीत करण्यात लोहिया यांनी निभावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर तसेच 1947 नंतर भारताच्या प्रगतीत त्यांनी दिलेल्या योगदानावर मोदी यांनी अधिक प्रकाश टाकला. पंतप्रधान म्हणाले की डॉ.लोहिया हे असामान्य विचारवंत होते आणि देशातील सामाजिक न्यायासाठी उठवल्या जाणाऱ्या प्रमुख आवाजांपैकी एक होते. डॉ.लोहिया यांचे लैंगिक समानता आणि सह्भागात्मक प्रशासन याविषयीचे विचार आजही तितकेच समर्पक आहेत याकडे निर्देश करत, गरिबांना आणि वंचितांना सक्षम करण्याप्रती डॉ. लोहिया यांची अविचल बांधिलकी अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. लैंगिक समानता आणि सह्भागात्मक प्रशासन याविषयीचे त्यांचे विचार तितकेच उल्लेखनीय आहेत.”

***

NehaKulkarni / SanjanaChitnis / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2243713) आगंतुक पटल : 68
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam