पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची इराणच्या अध्यक्षांशी दूरध्वनीवरुन चर्चा
ईद आणि नवरोजच्या शुभेच्छा देत पंतप्रधानानांनी प्रादेशिक स्थैर्य आणि सागरी सुरक्षेवर दिला भर
प्रविष्टि तिथि:
21 MAR 2026 4:26PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्रपती डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत, पश्चिम आशियातल्या घडामोडींविषयी चर्चा केली तसेच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावरही भर दिला.
ईद आणि नवरोज सणाच्या निमित्ताने, पंतप्रधानांनी, डॉ मसूद पेझेश्कियान यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी झालेल्या चर्चेत, दोन्ही नेत्यांनी, हा उत्सवाचा काळ पश्चिम आशियात, शांतता, स्थैर्य आणि समृद्धी घेऊन येणारा ठरेल, अशी आशा व्यक्त केली. या प्रदेशातील महत्वाच्या पायाभूत सुविधांवर अलीकडेच झालेल्या हल्ल्यांचा निषेध नोंदवत, पंतप्रधान मोदी यांनी, असे हल्ले प्रादेशिक स्थैर्य राखण्यात धोकादायक ठरून, महत्वाच्या जागतिक पुरवठा साखळीतही अडथळे निर्माण करत असल्याचे सांगितले. जागतिक स्तरावर सुरळीत नौवहनाचे स्वातंत्र्य अत्यंत महत्वाचे असल्याचा पुनरुच्चार करत, आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूकीचे मार्ग खुले आणि सुरक्षित राहतील, हे सुनिश्चित करणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. इराणमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षिततेची काळजी घेत असल्याबद्दल, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इराणचे आभारही मानले.
पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:-
“इराणचे राष्ट्रपती डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधत त्यांना ईद आणि नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. हा पवित्र उत्सवाचा काळ पश्चिम आशियात, शांतता, स्थैर्य आणि समृद्धी आणणारा ठरेल, अशी आशा आम्ही दोघांनीही व्यक्त केली.
या प्रदेशातील महत्वाच्या पायाभूत प्रकल्पावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवत, असे हल्ले प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक पुरवठा साखळीसाठी धोकादायक ठरतील, असे नमूद केले.
नौवहनाचे सर्व देशांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याला महत्त्व देण्याची गरज आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
इराणमधल्या भारतीयांना सुरक्षा आणि सुरक्षितता देण्यास इराण करत असलेल्या प्रयत्नांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.”
***
माधुरी पांगे/राधिका अघोर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2243391)
आगंतुक पटल : 81
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam