पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशातील इंदूर येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दुर्घटनेतील बाधितांसाठी मदत जाहीर
प्रविष्टि तिथि:
18 MAR 2026 2:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मार्च 2026
पंतप्रधानांनी इंदूर येथील आगीच्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि पीडित कुटुंबांना मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधानांनी इंदूरमधील आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांप्रती सह-वेदना व्यक्त केली आहे, आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या जवळच्या नतेवाईकला 2 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत दिली जाईल, अशी घोषणाही मोदी यांनी केली आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वर लिहिले आहे:
“मध्य प्रदेशातील इंदूर येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःख झाले. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रति सह-वेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी मी प्रार्थना करतो.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील: पीएम"
नितीन फुल्लुके /राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2241706)
आगंतुक पटल : 44
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam