दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सहा प्रमुख शहरांमध्ये दुसऱ्या दिवशी त्वरित आणि हमीपूर्वक वितरणासाठी टपाल विभाग "24 स्पीड पोस्ट’ सेवा सुरू करणार

प्रविष्टि तिथि: 16 MAR 2026 11:51AM by PIB Mumbai

टपाल विभाग 17 मार्च 2026 रोजी '24 स्पीड पोस्ट' सेवा केंद्र सुरू करत आहे. या सेवेचे उद्घाटन केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे आणि दूरसंचार राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांच्या हस्ते, या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत,नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवनातील 'रंगभवन सभागृहा'मध्ये दुपारी 12:30 वाजता होईल.

या सेवेद्वारे त्वरित आणि संवेदनशील टपाल त्वरित दुसऱ्या दिवशी वेळेत पोहोचवण्याची हमी घेतली जाते. पहिल्या टप्प्यात, ही सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये उपलब्ध असेल. यासोबतच, 24 आणि 48 तासांत या स्पीड पोस्ट सेवांना समर्पित प्रक्रिया खिडक्या आणि प्राधान्य एअर ट्रान्समिशनद्वारे सक्षम केलेल्या खात्रीशीर D+1 आणि D+2  टपाल उचित वेळात (डिलिव्हरी) करतील.या सेवांमध्ये ओटीपी- आधारित सुरक्षित वितरण, संदेश सूचनांसह 'एन्ड-टू-एन्ड' ट्रॅकिंग, व्यावसायिक ग्राहकांसाठी बीएमपीएल सुविधा, मोठ्या प्रमाणात बुकिंग केल्यास विनामूल्य पिकअप, एपीआय एकत्रीकरण आणि केंद्रीयकृत बिलिंग यांचा समावेश असेल; तसेच विलंब झाल्यास पैसे परत देण्याची ('मनी-बॅक') हमी देखील घेतली जाईल, ज्यामुळे 'इंडिया पोस्ट'च्या प्रीमियम एक्सप्रेस वितरण क्षमतांना अधिक समर्थन  मिळेल. 

***

NehaKulkarni / SampadaPatgaonkar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2240554) आगंतुक पटल : 113
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Punjabi , Telugu , Kannada