माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रसार भारती कॉपीराइट संरक्षण सुनिश्चित करत असून  उल्लंघन रोखण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवते


'क्रिएटर्स कॉर्नर' मधून दूरदर्शनवर सामाजिकदृष्ट्या प्रासंगिक आणि सांस्कृतिक सामग्रीला प्रोत्साहन दिले जाणार

Posted On: 13 MAR 2026 4:37PM by PIB Mumbai


प्रसार भारतीकडे त्यांच्याद्वारे निर्मित किंवा प्रायोजित प्रसारण सामग्रीचा प्रकाशन अधिकार (कॉपीराइट )आहेत. मीडिया प्रोडक्शन हाऊसेसकडून कॉपीराइट उल्लंघन झाल्याची अलीकडील काळात कोणतीही नोंद नाही.  मात्र मध्यस्थ प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक वापरकर्त्यांकडून कॉपीराइट उल्लंघनाचे प्रसार भारतीद्वारे नियमितपणे निरीक्षण  केले जाते आणि कारवाई केली जाते.  निर्मिती  कामाचे उप-कंत्राट देण्याचे कोणतेही उदाहरण प्रसार भारतीच्या निदर्शनास आलेले नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून, निर्मिती कंपन्यांसोबतच्या करारांमध्ये उप-कंत्राट प्रतिबंधित करण्याच्या तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

डीडी अंतर्गत ‘क्रिएटर्स कॉर्नर’ चा प्रारंभ  ही सार्वजनिक सेवा प्रसारकाच्या कार्याला पुढे नेण्यासाठी कंटेंट क्रिएटर्सना सहभागी करून घेण्याचा एक सक्रिय उपक्रम आहे. या उपक्रमाचा उद्देश सामाजिकदृष्ट्या प्रासंगिक सामग्रीचा  आणि तसेच भारताची चैतन्यशील संस्कृती आणि समृद्ध वारसा दर्शविणाऱ्या सामग्रीचा  व्यापक पोहोच आणि  प्रसार वाढवणे हा आहे. “क्रिएटर्स कॉर्नर” अंतर्गत निवडीसाठी, आशय उत्तम दर्जाचा असणे आवश्यक आहे आणि प्रसार भारतीच्या कार्यक्रम आणि जाहिरात संहिता तसेच सर्व लागू कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, कंटेंट क्रिएटर्सना किमान एका प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुरेशी डिजिटल पोहोच असणे आवश्यक आहे आणि प्रसार भारतीने निर्धारित केलेल्या कालावधी-आधारित दरांनुसार त्यांना मोबदला दिला जाईल.

माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी श्री तिरुची शिव यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात आज राज्यसभेत ही माहिती सादर केली.

***

नेहा कुलकर्णी / सुषमा काणे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2239823) अभ्यागत कक्ष : 26