पंतप्रधान कार्यालय
होजे अंतोनियो कास्ट रिस्ट यांनी चिलीच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले
प्रविष्टि तिथि:
13 MAR 2026 12:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 13 मार्च 2026
होजे अंतोनियो कास्ट रिस्ट यांनी चिलीचे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. भारत आणि चिली या देशांदरम्यान असलेले स्नेहपूर्ण आणि मैत्रीचे संबंध आणखी बळकट करण्यासाठी आणि दोन्ही देशांतील व्यापार, तंत्रज्ञान आणि उर्जा या क्षेत्रांतील सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी होजे यांच्यासह एकत्रित येऊन काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे मोदी यांनी सांगितले. “यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा!”, मोदी म्हणाले.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“होजे अंतोनियो कास्ट रिस्ट यांनी चिलीच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल त्यांचे स्नेहपूर्ण अभिनंदन. भारत आणि चिली या देशांदरम्यान असलेले स्नेहपूर्ण आणि मैत्रीचे संबंध आणखी बळकट करण्यासाठी आणि दोन्ही देशांतील व्यापार, तंत्रज्ञान आणि उर्जा या क्षेत्रांतील सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी होजे यांच्यासह एकत्रित येऊन काम करण्यासाठी उत्सुक आहे. यशस्वी कार्यकाळासाठी माझ्याकडून शुभेच्छा!”
@joseantoniokast
***
नेहा कुलकर्णी / संजना चिटणीस/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2239564)
आगंतुक पटल : 75
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam