पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपत्कालीन तेलसाठा खुला करण्याच्या आयईएच्या निर्णयाचे केंद्र सरकारकडून स्वागत

Posted On: 11 MAR 2026 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मार्च 2026

आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचा (आयईए) सहयोगी सदस्य आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा सहकार्यातील सक्रिय सहभागी म्हणून, भारत, तेल पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे सध्या उद्भवलेल्या परिस्थितीत आपत्कालीन तेल साठा खुला करण्याच्या आयईएच्या निर्णयाचे स्वागत करतो.

भारत सरकार जागतिक ऊर्जा बाजारपेठेतील,विशेषत: मध्यपूर्वेतील बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या प्रयत्नांना अनुसरून, जागतिक बाजारपेठेतील स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी आवश्यकतेनुसार योग्य त्या उपाययोजना करण्याची भारताची तयारी आहे.


शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2238663) अभ्यागत कक्ष : 17