पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 मार्च रोजी "सबका साथ सबका विकास - लोकांच्या महत्त्वाकांक्षांची परिपूर्ती" या संकल्पनेवर आधारित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला करणार संबोधित
प्रविष्टि तिथि:
08 MAR 2026 4:35PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 मार्च 2026 रोजी सकाळी 10:15 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत "सबका साथ सबका विकास - लोकांच्या महत्त्वाकांक्षांची परिपूर्ती" या संकल्पनेवर आधारित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करणार आहेत.
या संकल्पनेअंतर्गत शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य आणि आयुष, पर्यटन आणि आदरातिथ्य अशा विविध क्षेत्रांमधील अनेक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. या चर्चासत्रांमध्ये होणाऱ्या विचारमंथनात शिक्षण ते रोजगार मार्गाचे मजबुतीकरण, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स क्षेत्रातील आशय तयार करणाऱ्या क्रिएटर प्रयोगशाळा विकसित करणे, संबंधित आरोग्य व्यावसायिकांचा विस्तार आणि काळजीवाहू प्रशिक्षण, प्रादेशिक वैद्यकीय केंद्रे आणि नवीन आयुष संस्थांची निर्मिती, तसेच आदरातिथ्य कौशल्य विकास, शाश्वत पर्यटन मार्ग, ईशान्येकडील क्षेत्रातील बौद्ध सर्किट आणि वारसा पर्यटन प्रोत्साहन यासारख्या पर्यटन उपक्रमांचा समावेश असेल.
हा अर्थसंकल्पोत्तर वेबिनार सरकार, उद्योगजगत आणि संबंधित क्षेत्रातील तज्ञ यांच्यात सहकार्यात्मक संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देईल. या अंतर्गत अर्थसंकल्पात मांडलेल्या धोरणात्मक दृष्टीकोनाला कृतीशील धोरणांमध्ये रूपांतरित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. या दरम्यान होणाऱ्या संवादामुळे व्यावहारिक आणि वास्तविक सूचना निर्माण होतील अशी अपेक्षा असून त्यामुळे परिणामकारक अंमलबजावणी साध्य होईल तसेच सर्वसमावेशक वृद्धी आणि विकासाच्या दिशेने केल्या जाणाऱ्या प्रगतीला गती मिळेल.
***
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2236662)
आगंतुक पटल : 117
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Malayalam