पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नागरी सेवा परीक्षा 2025 यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
06 MAR 2026 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा परीक्षा 2025 यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की त्यांच्या समर्पण, चिकाटी आणि कठोर परिश्रमामुळे त्यांना हा महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे.
नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे ही सार्वजनिक सेवेच्या एका महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवात आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले . त्यांनी यशस्वी उमेदवारांना देशाची सेवा करण्याच्या आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्यांनाही पंतप्रधानांनी संदेश दिला. असे क्षण कठीण असू शकतात, मात्र एका लांबच्या प्रवासातील हे केवळ एक पाऊल आहे यावर त्यांनी भर दिला.
आगामी परीक्षांसाठी आणि देशासाठी व्यक्ती योगदान देऊ शकतील अशा अनेक प्रसंगांमध्ये अमाप संधी उपलब्ध आहेत हे अधोरेखित करून, पंतप्रधानांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;
“नागरी सेवा परीक्षा,2025 यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन. त्यांच्या समर्पण,चिकाटी आणि कठोर परिश्रमामुळे हा महत्त्वाचा टप्पा त्यांनी गाठला आहे.
देशाची सेवा करण्याच्या आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या प्रवासाला निघालेल्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.”
"ज्यांना नागरी सेवा परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही , त्यांचे मन मी समजू शकतो ,असे क्षण कठीण असू शकतात. मात्र एका लांबच्या प्रवासातील हे केवळ एक पाऊल आहे .भविष्यातील परीक्षांमध्ये आणि आपल्या राष्ट्रासाठी योगदान देण्याचे अनेक प्रसंग अशा अमाप संधी तुमच्यासमोर आहेत. पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा."
निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2236222)
आगंतुक पटल : 89
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Bengali
,
Bengali-TR
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada