माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सबका साथ, सबका विकास – लोकांच्या आकांक्षांची पूर्तता: शिक्षण, कौशल्य आणि विद्यापीठ टाऊनशिप्स" या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधान संबोधित करणार
भारतातील शिक्षण, कौशल्य आणि एव्हीजीसी–क्रिएटर इकॉनॉमी परिसंस्था बळकट करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मधील उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी वेबिनारचे आयोजन
Posted On:
06 MAR 2026 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मार्च 2026
केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या प्रमुख उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने आयोजित "सबका साथ, सबका विकास – लोकांच्या आकांक्षांची पूर्तता: शिक्षण, कौशल्य आणि विद्यापीठ टाऊनशिप्स" या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत.
या उद्घाटन सत्राला सकाळी 11.30 वाजता पंतप्रधान उपस्थित राहणार असून, ते एव्हीजीसी–क्रिएटर इकॉनॉमी (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) या क्षेत्रातील अर्थसंकल्पीय उपक्रमांमागील दृष्टीकोनावर विशेष संबोधन करतील. या क्षेत्रात सर्जनशीलता, संस्कृती आणि तंत्रज्ञान यांचा संगम होऊन विकास, रोजगार आणि 'सॉफ्ट पॉवर'ला चालना मिळणार आहे. या वेबिनारमध्ये धोरणकर्ते, उद्योगधुरीण, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती, स्टार्टअप्स आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
एव्हीजीसी कंटेंट क्रिएटर लॅब्जवर दुपारी 12:20 PM ते 01:50 PM दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ब्रेकआउट सत्र
या वेबिनारचा एक भाग म्हणून, माहिती आणि प्रसारण मंत्रालय "शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एव्हीजीसी कंटेंट क्रिएटर लॅब्ज" या विषयावर एका ब्रेकआऊट सत्राचे आयोजन करणार आहे. हे सत्र 15000 शाळा आणि 500 उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये एव्हीजीसी कंटेंट क्रिएटर लॅब्स स्थापन करण्याच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करेल. सर्जनशील प्रतिभेला प्रोत्साहन देणे, भारताची ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) परिसंस्था बळकट करणे आणि देशाच्या वेगाने विस्तारणाऱ्या 'ऑरेंज इकॉनॉमी'साठी कुशल निर्मात्यांची एक मजबूत फळी तयार करणे हा याचा उद्देश आहे,
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एव्हीजीसी कंटेंट क्रिएटर लॅब्स" या विषयावरील ब्रेकआउट सत्र दुपारी 12:20 ते 01:50 या वेळेत नियोजित असून, त्याचे संचालन व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष आणि सीटीओ चैतन्य चिंचलीकर करतील. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करणारे बीजभाषण करतील.
या वेबिनारद्वारे AVGC कंटेंट क्रिएटर लॅब्स उपक्रम, ज्याचा उद्देश तरुण भारतीयांना सर्जनशील आणि डिजिटल कौशल्यांनी सुसज्ज करणे आणि AVGC क्षेत्रात भारताला जागतिक नेता म्हणून स्थान देणे हा आहे त्यांच्या अंमलबजावणीसाठी करण्यासारखी कृती अंतर्दृष्टी आणि सहयोगी धोरणे तयार होण्याची अपेक्षा आहे.
या सत्रानंतर सरकार आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञमंडळ चर्चा होईल, ज्यामध्ये धीरज साहू, अतिरिक्त सचिव (शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग), डॉ. आशिष कुलकर्णी (अध्यक्ष, फिक्की , AVGC मंच), राजन नवानी (संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी जेटसिंथेसिस), आणि सोनम भगत (मुख्य कार्यकारी अधिकारी Vygr), तसेच IICT मधील विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश असेल. मुंजाल श्रॉफ (ग्राफिटी मल्टीमीडिया), बिरेन घोष (टेक्निकलर ग्रुप), मानवेंद्र शुकुल (लक्ष्य डिजिटल), माला शर्मा, (अॅडोब इंडिया), प्रीती व्यास (अमर चित्र कथा) आणि मायभारतच्या 2 युवा स्वयंसेवकांच्या सहभागाने ही चर्चा अधिक समृद्ध होईल.
समारोप सत्र -कालावधी 4.30 ते 5.45
समारोप सत्रात वेबिनारच्या फलश्रुतीचा सारांश सादर केला जाईल.सायंकाळी 05:25 वाजता माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष भाषण होईल.
सहभाग आणि वेबकास्ट
शैक्षणिक संस्था,उद्योग संस्था, स्टार्टअप्स, निर्माते, विद्यार्थी, पालक आणि AVGC क्षेत्रातील व्यावसायिकांसह भागधारकांना या वेबिनारमध्ये सामील होण्यासाठी आणि चर्चेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
वेबिनार पुढील लिंकवर थेट पाहता येईल:
YouTube Live: https://youtube.com/live/seASZfw_G1Y?feature=share
या वेबिनारद्वारे AVGC कंटेंट क्रिएटर लॅब्स उपक्रम, ज्याचा उद्देश तरुण भारतीयांना सर्जनशील आणि डिजिटल कौशल्यांनी सुसज्ज करणे आणि AVGC क्षेत्रात भारताला जागतिक नेता म्हणून स्थान देणे हा असून अंमलबजावणीसाठी सूचना आणि सहयोगी धोरणे यात साहाय्य मिळण्याची अपेक्षा आहे.
सोनाली काकडे/शैलेश पाटील/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2236176)
अभ्यागत कक्ष : 27