वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
टोकियोमध्ये भारत-जपान सीईपीए संयुक्त समितीची 7वी बैठक संपन्न; वाणिज्य विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी या चर्चासत्राचे सह-अध्यक्षपद भूषवले
Posted On:
04 MAR 2026 7:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मार्च 2026
भारत-जपान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (सीईपीए) अंतर्गत संयुक्त समितीची 7वी बैठक 2 मार्च 2026 रोजी टोकियो, जपान येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाचे सचिव राजेश अग्रवाल आणि जपान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ उपमंत्री यांनी संयुक्तपणे भूषवले.
दोन्ही बाजूंनी सीईपीएच्या अंमलबजावणीशी संबंधित मुद्द्यांचा आढावा घेतला आणि द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
बैठकीच्या निमित्ताने वाणिज्य विभागाचे सचिव अग्रवाल यांनी अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या (METI) उपमंत्र्यांची भेट घेतली. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक, व्यावसायिक वातावरणात सुधारणा आणि जागतिक व्यापार संघटनेच्या आगामी 14 व्या मंत्रीस्तरीय परिषदेसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या उपमंत्र्यांशी झालेल्या बैठकीदरम्यान, अग्रवाल यांनी दोन्ही अर्थव्यवस्थांमधील मजबूत पूरकतेवर - तंत्रज्ञान, भांडवल आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील जपानची ताकद आणि भारताचे कुशल कामगार, मोठी बाजारपेठ आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था यावर भर दिला . त्यांनी सीईपीएचे पूर्ण लाभ घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यामध्ये लीडर्स समिट दरम्यान कल्पना मांडल्याप्रमाणे व्यक्तींच्या येण्याजाण्याचा समावेश आहे.
अग्रवाल यांनी कापड, औषधनिर्माण, शेती आणि सेवा यासारख्या क्षेत्रात जपानमध्ये भारतीय निर्यातीत वाढ होण्याच्या अपार संधी असल्याचे नमूद केले. दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी अधिक संतुलित द्विपक्षीय व्यापार संबंध साध्य करण्याचे महत्त्व देखील त्यांनी अधोरेखित केले.
वाणिज्य सचिवांनी गोलमेज संवादादरम्यान जपानी उद्योगाच्या प्रमुख प्रतिनिधींशी देखील संवाद साधला.

(Commerce Secretary with Sr. Deputy Minister, MoFA, Japan)

(Commerce Secretary with CII delegation at Roadshow)

(Commerce Secretary with Dr. Yamada of Nikkie Asia in Fireside Chat during Roadshow)
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2235349)
अभ्यागत कक्ष : 66