राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

होळीनिमित्त राष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 03 MAR 2026 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,3 मार्च 2026

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी होळीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपतींनी एका संदेशात म्हटले आहे की, “होळीच्या आनंददायी प्रसंगी, देशात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.

होळी हा आनंद आणि उल्हास यांचा सण असून तो सामाजिक सलोख्याचा संदेश देतो. हा सण समाजात स्नेह  आणि आशा वृद्धिंगत करतो तसेच सामाजिक एकतेची भावना बळकट करतो. होळी ही विविधतेतील एकतेचे प्रतीक देखील आहे.

होळीचे रंग सगळ्यांच्या जीवनात आनंद घेऊन येवोत.आपण सर्वजण एकत्र मिळून विकसित राष्ट्र उभारणीत योगदान देऊ”.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.


निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2235108) आगंतुक पटल : 94
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam