नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मध्य पूर्व हवाई क्षेत्राची परिस्थिती

Posted On: 02 MAR 2026 10:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2026

नागरी विमान वाहतूक मंत्रालय मध्य पूर्वेच्या भागांमधील हवाई क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीवर आणि त्याचा आंतरराष्ट्रीय उड्डाण संचालनावर होणाऱ्या परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. 

भारतीय विमान कंपन्यांनी त्यांच्या वेळापत्रकात समतोल आणि नियोजित बदल केले असून दीर्घ आणि अति दीर्घ पल्ल्याची  उड्डाणे, निर्बंधित हवाई क्षेत्र टाळणाऱ्या पर्यायी मार्गाद्वारे टप्प्याटप्प्याने हळूहळू पुन्हा सुरू केली जात आहेत. लवकरात लवकर परिचालन स्थैर्य पुन्हा स्थापित करण्यासाठी विमान आणि कर्मचाऱ्यांच्या रिपोझिशनिंग  उपाययोजना सुरू आहेत.

अडकलेल्या प्रवाशांचा प्रवास  सुलभ करण्यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. आवश्यकतेनुसार विमान कंपन्या अतिरिक्त उड्डाण क्षमता उपलब्ध करून देत आहेत तसेच परदेशी विमान वाहतूक अधिकारी आणि परदेशातील भारतीय दूतावासांशी जवळून समन्वय साधून प्रवाशांची सुरक्षित आणि सुव्यवस्थित वाहतूक  सुनिश्चित केली जात आहे.

इंडिगोने आवश्यक मंजुरी आणि प्रचलित हवाई क्षेत्राच्या परिस्थितीनुसार अडकलेल्या प्रवाशांना परत आणण्यासाठी 3 मार्च 2026 रोजी जेद्दाह ते भारत 10 विशेष मदत उड्डाणांचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी इंडिगो जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाशी समन्वय साधत आहे.

 भारत आणि आखाती प्रदेशादरम्यान सेवा देणाऱ्या परदेशी विमान कंपन्या देखील कार्यकारी आणि हवाई क्षेत्रातील स्थिती लक्षात घेऊन मर्यादित प्रमाणात उड्डाणे करत आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. सर्व विमान कंपन्यांना प्रवाशांशी पारदर्शक संवाद राखण्याचा आणि परतावा, पुनर्निर्धारण आणि प्रवाशांना मदत करण्याबाबतच्या नियामक आवश्यकतांचे पालन सुनिश्चित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांकडून ताज्या उड्डाण स्थितीची खात्री करण्याचा आणि अद्ययावत माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला नागरी विमान वाहतूक सचिव समीर कुमार सिन्हा आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.

सुरक्षित उड्डाण संचालन, सेवांचे  सुव्यवस्थित पुनर्संचालन आणि प्रभावित प्रवाशांची सोय सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालय विमान कंपन्या, विमानतळ प्राधिकरण, नियामक अधिकारी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी सतत समन्वय साधत आहे.

आवश्यकतेनुसार पुढील अद्यतने जारी केली जातील.


सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2234803) अभ्यागत कक्ष : 80