पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राजस्थानमधील अजमेर येथे राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीम आणि 17,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांच्या शुभारंभादरम्यान आपण केलेल्या भाषणाची क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक

Posted On: 28 FEB 2026 9:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये अजमेर येथे राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीम आणि 17,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांच्या शुभारंभादरम्यान केलेल्या  भाषणाची क्षणचित्रे सामायिक केली.

X पोस्टच्या मालिकेत पंतप्रधान मोदी म्हणाले;

“आमचे सरकार सर्वांगीण विकासासाठी संकल्पबद्ध आहे. याच अनुषंगाने आज अजमेर येथून राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण  अभियानाच्या प्रारंभासह अनेक प्रकल्पांचे उद्घाटन-पायाभरणी तसेच युवकांना नियुक्त पत्रांचे वितरण करण्याचे सौभाग्य लाभले.

 

“भाजपाचे डबल इंजिन सरकार युवा शक्तीला सक्षम बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. अजमेरमध्ये आपल्या युवा मित्रांना नियुक्ती पत्रे प्रदान करून खूप आनंद झाला."

 

“अजमेरच्या  कार्यक्रमात मोठ्या संख्येने आलेल्या  राजस्थानच्या आपल्या कुटुंबीयांचा उत्साह सांगत आहे की डबल इंजिन सरकारच्या विविध  विकास कामांमुळे ते किती उत्साहित आहेत."

 

“वीरांगनांची भूमी असलेल्या राजस्थानच्या अजमेर येथून देशभरातील मुलींसाठी  HPV लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करून खूप आनंद झाला. देशाच्या मातृशक्तीला निरोगी आणि सशक्त बनवण्याच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.”

 

“काँग्रेसला संपूर्ण देशात पराभवाचा सामना करावा लागत आहे आणि रागाने तो पक्ष याचा बदला भारताला बदनाम करून घेत आहे. जागतिक एआय शिखर परिषदेत परदेशी पाहुण्यांसमोर  भारताला अपमानित करण्याचा त्यांचा प्रयत्न हेच सांगतो.”

 

“डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळे राजस्थानच्या आपल्या शेतकरी बंधू भगिनींना सिंचन प्रकल्पांचा मोठा लाभ होत आहे. यातून काँग्रेसचे  कुशासन आणि भाजपाचे  सुशासन यातील फरक स्पष्टपणे दिसून येत आहे.”

 

"अजमेर येथून आज, गर्भाशय मुखाच्या  कर्करोगाविरुद्ध राष्ट्रीय एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून अजमेर येथील मनीषा रावत या लसीकरण झालेल्या पहिल्या व्यक्ती ठरल्या. महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी हा एक प्रमुख  उपक्रम आहे."

 

"गर्भाशयमुखाच्या  कर्करोगाविरुद्ध एचपीव्ही लसीकरण मोहिमेच्या प्रारंभानंतर, आज लसीकरण झालेल्या माझ्या युवा सहकाऱ्यांशी बोललो. आपल्या मुली आणि मातांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल आहे."

 

* * *

माधुरी पांगे/सुषमा काणे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2234073) अभ्यागत कक्ष : 9