गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महान क्रांतिकारक, चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली

प्रविष्टि तिथि: 27 FEB 2026 3:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2026

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महान क्रांतिकारक, चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली आहे.

यासंदर्भात अमित शहा यांनी X या समाज माध्यमावर संदेश समाायिक केला आहे. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत वंदे मातरम चा जयघोष करत चंद्रशेखर आझाद ब्रिटीश राजवटीविरुद्ध अत्यंत धैर्याने लढले. काकोरी रेल्वे लूट (Kakori train action) असो, हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची (HSRA) स्थापना असो किंवा क्रांतिकारकांसाठी एका शक्तिशाली संघटनेची निर्मिती असो, चंद्रशेखर आझाद यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी समर्पित होता असे अमित शहा यांनी म्हटले आहे.  त्यांच्या बलिदानाची गाथा आजही आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करते, असेही अमित शहा यांनी नमूद केले आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2233496) आगंतुक पटल : 66
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Punjabi , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam