पंतप्रधान कार्यालय
कॅनडाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार
Posted On:
26 FEB 2026 10:40AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, कॅनडाचे पंतप्रधान 'द राइट ऑनरेबल' मार्क कार्नी 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2026 या कालावधीत भारताच्या शासकीय दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान कार्नी यांचा हा पहिलाच शासकीय भारत दौरा असेल.
27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान कार्नी यांचे मुंबईत आगमन होईल. पुढील दोन दिवसांत ते विविध व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील; तसेच भारतीय आणि कॅनेडियन सीईओ, उद्योग व आर्थिक तज्ज्ञ, नवोन्मेषक, शिक्षणतज्ज्ञ आणि भारतस्थित कॅनेडियन पेन्शन फंड्सच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील.
पंतप्रधान कार्नी 1 March रोजी नवी दिल्लीत पोहोचतील. 2 March रोजी दोन्ही पंतप्रधानांमध्ये हैदराबाद हाऊस येथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा होईल. कानानास्किस (जून 2025) आणि जोहान्सबर्ग (नोव्हेंबर 2025) मधील त्यांच्या आधीच्या भेटींच्या आधारावर, दोन्ही नेते भारत-कॅनडा धोरणात्मक भागीदारीच्या विविध क्षेत्रांतील आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतील. ते व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे, कृषी, शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष, तसेच दोन्ही देशांच्या जनतेचे परस्परसंबंध यांसारख्या प्रमुख स्तंभांमधील सुरू असलेल्या सहकार्याचाही आढावा घेतील. दोन्ही नेते प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही विचारांचीदे वाणघेवाण करतील.
पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान कार्नी त्याच दिवशी नंतर नियोजित असलेल्या 'भारत-कॅनडा सीईओज फोरम'ला देखील उपस्थित राहणार आहेत.
भारत-कॅनडा द्विपक्षीय संबंध पूर्ववत होत असताना एका महत्त्वाच्या टप्प्यावर हा दौरा होत आहे. दोन्ही पंतप्रधानांनी यापूर्वी एकमेकांच्या चिंता आणि संवेदनशीलतांबद्दल परस्पर आदर, दोन्ही देशांच्या जनतेचे परस्परसंबंध आणि वाढत्या आर्थिक पूरकतेवर आधारित विधायक आणि संतुलित भागीदारी पुढे नेण्याचे मान्य केले आहे. नेत्यांमधील आगामी भेट भारत आणि कॅनडाच्या सकारात्मक गतीला आणि भविष्याभिमुख भागीदारी निर्माण करण्याच्या सामायिक दृष्टिकोनाला पुष्टी देण्याची संधी प्रदान करेल.
***
NehaKulkarni / ShileshPatil / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2232991)
अभ्यागत कक्ष : 44
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam