इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
एआय इम्पॅक्टवरील नवी दिल्ली जाहिरनाम्यात आणखी काही देशांचा सहभाग
Posted On:
24 FEB 2026 11:19AM by PIB Mumbai
18 -19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 चा समारोप एआय इम्पॅक्टवरील नवी दिल्ली जाहिरनाम्याच्या स्वीकृतीने झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेवरील जागतिक सहकार्यात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
21 फेब्रुवारी 2026 पर्यंत 88 देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी या जाहिरनाम्याला समर्थन दिले होते. त्यानंतर, आणखी 3 देश – बांगलादेश, कोस्टा रिका आणि ग्वाटेमाला यांनी या जाहिरनाम्याला समर्थन दिले. यामुळे या जाहिरनाम्यावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांची एकूण संख्या 91 झाली आहे.
त्यानुसार, या विषयावरील 21 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक (ID: 2231208) ३ नवीन स्वाक्षरीकर्त्यांच्या समावेशासह अद्यतनित करण्यात आले आहे:
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2231208®=3&lang=2#:~:text=Guided%20by%20the%20principle%20of,Respecting%20national%20sovereignty
***
NitinFulluke / ShradhhaMukhedkar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2232586)
अभ्यागत कक्ष : 10