मंत्रिमंडळ
गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (जीएमआरसी) च्या गिफ्ट सिटी ते शाहपूर पर्यंतच्या विद्यमान उत्तर-दक्षिण कॉरिडॉरच्या विस्ताराला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
Posted On:
24 FEB 2026 5:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (जीएमआरसी) च्या गिफ्ट सिटी ते शाहपूर पर्यंतच्या विस्ताराला मंजुरी दिली. हा विस्तार 3.33 किलोमीटर लांबीचा असून त्यात तीन उन्नत स्थानके असतील. हा प्रकल्प अंदाजे चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
प्रकल्पाचा खर्च सुमारे 1067.35 कोटी रुपये असेल. या विस्तारित मार्गाचा लाभ 2029 मध्ये सुमारे 23,702 प्रवाशांना तर 2041 मध्ये अंदाजे 58,059 प्रवाशांना होण्याची अपेक्षा आहे.
या कॉरिडॉरमुळे अहमदाबाद आणि गिफ्ट क्षेत्रादरम्यानचा संपर्क मजबूत होईल. प्रस्तावित मार्गावर असलेल्या प्रमुख बहुराष्ट्रीय कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक केंद्रांना यांचा थेट लाभ होईल.
याव्यतिरिक्त, हा विस्तार अहमदाबाद आणि गिफ्ट प्रदेशादरम्यान प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांना व्यवसाय, रोजगार आणि शिक्षणाशी संबंधित प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरेल, परिणामी नेटवर्क इंटिग्रेशन आणि प्रवाशांच्या सोयींमध्ये लक्षणीय वाढ होईल.
या प्रकल्पामुळे बांधकाम क्षेत्रात सुमारे 1,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. बांधकामानंतरच्या टप्प्यात संचलन आणि देखभालीसाठी सुमारे 250 लोकांना रोजगार मिळेल. या प्रकल्पामुळे वर नमूद केलेल्या संख्येइतक्याच प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. इतर उपक्रमांमुळे आणखी जास्त लोकांसाठी अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील.
हा प्रकल्प गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (GMRC) द्वारे राबविला जाणार असून हा भारत सरकार आणि गुजरात सरकारचा 50:50 संयुक्त भागीदारीतील उपक्रम आहे.
पार्श्वभूमी:
सध्या, गुजरात मेट्रोचा 68.28 किमी लांबीचा अहमदाबाद मेट्रो टप्पा-1 {एपीएमसी ते मोटेरा स्टेडियम (उत्तर-दक्षिण कॉरिडॉर) आणि थलतेज गाम ते वस्त्रल गाम (पूर्व-पश्चिम कॉरिडॉर)} तसेच टप्पा-2 (मोटेरा स्टेडियम ते महात्मा मंदिर आणि जीएनएलयू ते गिफ्ट सिटी) असे गुण 53 स्थानकांसह यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आले आहेत.
टप्पा-1 सप्टेंबर-2022 पासून तर टप्पा-2 जानेवारी-2026 पासून कार्यान्वित झाले आहेत. या मार्गावर दररोजची प्रवासी संख्या सुमारे 1,60,000 इतकी आहे.
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2232270)
अभ्यागत कक्ष : 15
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam