पंतप्रधान कार्यालय
तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जे. जयललिता जी यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
24 FEB 2026 9:33AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. लोकांच्या हृदयात आणि मनात कायमचे स्थान मिळविणाऱ्या अत्यंत प्रभावशाली नेता आणि एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून पंतप्रधानांनी त्यांचे स्मरण केले आहे.
महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि समावेशक विकासावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करत कल्याणकारी प्रशासन समर्थपणे चालवत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या परिवर्तनकारी कारकिर्दीवर मोदी यांनी प्रकाश टाकला.
पंतप्रधानांनी त्यांच्यासोबत झालेल्या संतोषजनक संवादाचे स्मरण केले. या महिन्याच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींनी त्यांच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल व्यक्त केलेले विशिष्ट विचार यावेळी सामायिक केले आहेत.
आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:
"जयललिताजी यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण. त्यांनी एक अत्यंत प्रभावशाली नेता आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून असंख्य लोकांच्या हृदयात आणि मनात स्थान निर्माण केले होते. त्यांचा जीवन प्रवास प्रचंड धैर्य आणि दृढनिश्चयाने भरलेला होता. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि समावेशक विकासावर भर देऊन कल्याणकारी प्रशासनाचे समर्थन केले. त्या संवेदनशील तसेच निश्चयी होत्या. त्यांच्याशी झालेल्या संतोषजनक संवादांचे मी स्मरण करतो.”
“या महिन्याच्या #मन की बात या कार्यक्रमात मी त्यांच्याविषयी व्यक्त केलेले विचार सामायिक करत आहे."
***
NitinFulluke / SampadaPatgaonkar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2232018)
आगंतुक पटल : 65
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam