इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

सर्वांसाठी ए आय: भारत मंडपम येथे बहुभाषिक ओपन-सोर्स एक आय प्रोटोटाइप (सार्वजनिक वापरासाठी खुला ठेवलेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा नमुना)चं सादरीकरण

Posted On: 21 FEB 2026 1:03PM by PIB Mumbai

 

सर्वसमावेशक आणि स्थानिक पातळीवर उपयुक्त अशा AI प्रणाली तयार करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे दर्शन घडवत, 20 फेब्रुवारी रोजी भारत मंडपम येथे “सर्वांसाठी AI: वैयक्तिक, स्थानिक आणि बहुभाषिक AI चा पुरस्कार” या विषयावर एक सत्र आयोजित करण्यात आले होते.

या सत्रात डिजिटल इंडिया भाषिणी  विभाग, करंट एआय  आणि कल्पा इम्पॅक्ट  यांच्या सहकार्याने विकसित केलेल्या, आपल्या प्रकारच्या पहिल्याच 'ओपन-सोर्स हँडहेल्ड बहुभाषिक AI प्रोटोटाइप'चे (सार्वजनिक वापरासाठी खुला ठेवलेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा नमुना) थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. हे छोटे आणि आवाजावर आधारित उपकरण गोपनीयतेचे रक्षण करणारे असून, इंटरनेट नसलेल्या किंवा कमी कनेक्टिव्हिटी असलेल्या भागातही काम करण्यास सक्षम आहे. हे उपकरण बहुभाषिक संवाद थेट उपकरणावरच हाताळते, ज्यामुळे सतत इंटरनेटची गरज न भासता विविध भाषांमध्ये रिअल-टाइम माहिती मिळवणे शक्य होते.

हे प्रोटोटाइप भारताच्या अशा AI प्रणाली विकसित करण्याच्या ध्येयाचे प्रतीक आहे, ज्या सर्वसमावेशक, सांस्कृतिक मुळांशी जोडलेल्या आणि भाषिक विविधतेने नटलेल्या आहेत. जनहितासाठी साहाय्यक तंत्रज्ञान म्हणून रचना केलेले हे उपकरण दर्शवते की, ओपन-सोर्स AI हार्डवेअर सुरक्षित, सुलभ आणि मोठ्या प्रमाणावर वापरण्यायोग्य असू शकते; विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांसाठी ते अत्यंत उपयुक्त आहे. थेट प्रात्यक्षिकादरम्यान याच्या बहुभाषिक वापराची उदाहरणे आणि भारताच्या वैविध्यपूर्ण भाषा परिसंस्थेतील त्याची क्षमता अधोरेखित करण्यात आली.

भाषिणी चमुने हे प्रोटोटाइप केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना देखील सादर केले. “सर्वांसाठी ए आय” या संकल्पनेशी सुसंगत अशा सर्वसमावेशक, बहुभाषिक आणि स्थानिक पातळीवर वापरण्यायोग्य एक आय उपायांच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे मंत्र्यांनी कौतुक केले.

हे सहकार्य जागतिक भागीदारीचे एक धोरणात्मक मॉडेल आहे, ज्यात भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा  आणि भाषिक ए आय तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खुल्या हार्डवेअर नवकल्पनांशी जोडले गेले आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून, एक 'ग्लोबल इनोव्हेशन चॅलेंज' (जागतिक नवोन्मेष आव्हान) देखील जाहीर करण्यात आले आहे. याद्वारे अभियांत्रिकीचे विद्यार्थी आणि नवोदित व्यावसायिकांना या ओपन-सोर्स प्रोटोटाइपवर आधारित अधिक संशोधन आणि विकास करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, ज्यामुळे भारताची नाविन्यपूर्ण परिसंस्था अधिक मजबूत होईल.

या सत्रात ए आय मधील एकाधिकारशाही रोखण्याचे महत्त्व आणि उदयोन्मुख ए आय प्रणाली जागतिक स्तरावर एकमेकांशी जोडलेल्या राहूनही आपली भाषिक आणि सांस्कृतिक विविधता कशी जपू शकतात, यावर भर देण्यात आला.

हा उपक्रम सर्वसमावेशक, बहुभाषिक आणि गोपनीयतेचे रक्षण करणाऱ्या ए आय विकासामध्ये भारताचे स्थान जागतिक स्तरावर अग्रेसर म्हणून मजबूत करतो. तसेच, जगभरातील न्याय्य आणि जबाबदार ए आय नवकल्पनांसाठी एक व्यापक मॉडेल सादर करतो.

***

हर्षल आकुडे/आशुतोष सावे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2231244) अभ्यागत कक्ष : 16