पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अरुणाचल प्रदेश राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 20 FEB 2026 9:35AM by PIB Mumbai

 

अरुणाचल प्रदेश राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 

परंपरा आणि निसर्ग यांच्यातील सुसंवादाचे एक जाज्वल्य उदाहरण आहे, असे सांगत पंतप्रधानांनी अरुणाचल प्रदेशची प्रशंसा केली. देशाच्या प्रगतीला बळकटी देण्यात येथील उत्साही आणि कष्टाळू नागरिकांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही  त्यांनी नमूद केले.  

आपल्या ‘एक्स’ पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे:

“अरुणाचल प्रदेशच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!”

“भव्य भूप्रदेश आणि अनन्यसाधारण सांस्कृतिक विविधतेने नटलेले अरुणाचल प्रदेश हे राज्य परंपरा आणि निसर्ग यांच्यातील सुसंवादाचे एक जाज्वल्य उदाहरण आहे. येथील उत्साही आणि कष्टाळू नागरिक देशाच्या प्रगतीला बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच या राज्याची वैविध्यपूर्ण आदिवासी संस्कृती आपल्या राष्ट्राच्या समृद्धीत प्रचंड भर घालत आहेत.” 

“येत्या काळात हे राज्य विकासाची नवीन उंची गाठत राहो या सदिच्छा.”

***

नितीन फुल्लुके / संपदा पाटगावकर/परशुराम कोर

Follow us on social media: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2230637) आगंतुक पटल : 81
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam